हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तिची स्माईल, तिची स्टाईल, तिची अदा सगळं काही कातिलाना आहे. अतिशय लाडकी अशी प्राजू आपल्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना मोहित करत असते. अभिनयाइतकीच चुणचुणीत सूत्रसंचालिका म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे.
अनेकदा प्राजक्ताला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. पण याविषयी ती कधीच खुले वक्तव्य करताना दिसली नाही. पण सध्या सोशल मीडियावर येत्या वर्षात प्राजक्ता माळी लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेमागील नक्की कारण काय..? हे जाणून घेऊया.
सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे यावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. हे चाहते प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर केली कि त्यावर हमखास ‘तु लग्न कधी करणार..?’ असा प्रश्न विचारतात. तर आता सेलिब्रिटी ज्योतिषी अनंत पटवा यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी येणारं २०२३ हे नवं वर्ष कसं असणार आहे..? याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आपल्या ज्योतिष ज्ञानाच्या जोरावर त्यांनी या वर्षात प्राजक्ताच्या कुंडलीत लग्नाचा योग आहे का..? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का..? याबद्दलची माहिती दिली आहे.
तर सेलिब्रिटी ज्योतिषी अनंत पटवा यांनी सांगितले आहे कि, ‘येणारे पुढिल वर्ष हे अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी चांगले असणार आहे. या वर्षात तिला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.
या वर्षात तिचे करिअर उंचीच्या शिखरावर जाणार आहे. तसेच २३ जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींमध्ये फायदा होणार आहे. जुलै २०२३ नंतर तिचे व्यक्तिगत आयुष्य फारच चांगले राहणार आहे. गुरुकृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योगदेखील काही प्रमाणात दिसत आहेत. मात्र ती तिच्या कामात व्यस्त असल्यामूळं ती लग्नाचा प्लॅन पुढं ढकलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Discussion about this post