हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन रोज नव्या भांडणामुळे चर्चेत असतो. कधी बाचबाची, कधी शिवीगाळ, कधी मारामारी.. काही ना काही या घरात सुरूच असतं. पण काहीही असलं तरी हा सीजन एकदम जोरात चालू आहे. प्रेक्षक या सीजनवर भरभरून प्रेम करत आहेत. नुकताच या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क झाला. ज्यामध्ये शिव, एमसी स्टॅन, अब्दू, निम्रित, प्रियांका हे सदस्य सोडून बाकी सगळे नॉमिनेट झाले. यानंतर आज घरात प्रत्येकाच्या नाकी नऊ आणनारी अर्चना गौतम ही एमसी स्टॅनला भिडताना दिसणार आहे. तस तर या घरात कोणतंही कारण भांडायला पुरेस असंत. पण घरातील ड्युटी करणे किंवा न करणे हे कारण नेहमीच मोठा मुद्दा ठरतो.
यावेळी घरात अर्चना आणि स्टॅन यांच्यामध्ये घरातील ड्युटी याच मुद्द्यावर बाचाबाची होताना दिसणार आहे. कलर्स टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अर्चना कॅमेरासमोर जोरजोरात ओरडून एमसी स्टॅनच्या चाहत्यांना सांगताना दिसते आहे कि, ‘याने कचरा नाही काढला.’ यावर स्टॅन म्हणतो, ‘तुझ्या बापाचा नोकर आहे का मी.?’ तर अर्चना म्हणते कि, माझा बाप बिग बॉस आहे. तर एमसी स्टॅन म्हणतो, ‘आता बिग बॉस तुझ्या आईचा झाला का..?’ हे ऐकून अर्चना भडकते आणि आणखीच वैतागून बोलते, ‘तुला आई नाहीये का..?’ जो माणूस दुसऱ्यांच्या आई वडिलांची इज्जत ठेऊ शकत नाही तो घटीया असतो.
या भांडणादरम्यान एमसी स्टॅन आणि अर्चना एकमेकांच्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या दरम्यान एमसी अर्चनाच्या आई वडिलांविषयी जे वक्तव्य करतो त्याचे पडसाद काय उमटणार..? यावर आता सगळ्यांचे लक्ष आहे. अलीकडेच एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम या दोघांनाही सलमान खानने आपली वागणूक आणि भाषा यामध्ये सुधार करा असे निक्षून सांगितले होते. यानंतर आता पुन्हा एकदा भांडताना त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे आता विकेंडला सलमान खान या दोघांची आणि खास करून एमसी स्टॅनची शाळा घेणार का..? हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
Discussion about this post