हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनची सांगता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या रविवारी या सिजनचा ग्रँड फिनाले होणार आहे आणि या सिजनचा कोण विजेता होणार.? या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणार आहे. अलीकडेच प्रसाद जवादेसारखा स्ट्रॉंग स्पर्धक या घरातून बाहेर पडला आणि बिग बॉस मराठीच्या घाट उरले शेवटचे ६ सदस्य. यामध्ये अपूर्वा नेमळेकरने टिकिट टू फिनाले जिंकून शेवटच्या आठवड्यात आधीच एंट्री करीत एक पाऊल ट्रॉफीकडे टाकले. तर इतर सदस्यांनीही शेवटच्या आठवड्यात आपली जागा मिळवली. दरम्यान बिग बॉसच्या घरात आपला प्रवास कसा होता..? याची एक क्लिप प्रत्येक सदस्यासाठी बिग बॉसने तयार केली आहे. जी पाहून किरण माने अर्थात सातारचा बच्चनसुद्धा ढसाढसा रडला.
यावेळी बिग बॉसने किरण मानेंची ओळख साताऱ्याचा बच्चन अशी करून दिली. ज्यामुळे घरात प्रत्येक प्रसंगाला वाघासारखा भिडलेला गडी लहान लेकरासारखा रडताना दिसून आला. किरण माने प्रचंड भावूक झाल्याचा हा क्षण त्यांच्या चाहत्यांनाही भावुक करून गेला. ‘भाग गेला क्षीण गेला.. अवघा झाला आनंद’ अशा अभंगांच्या ओळीतून त्याने बिग बॉसमधील त्याचा प्रवास उलगडला. शिवाय ‘मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी त्या स्टेजवरुनही हेच सांगेन की ‘बिग बॉस’माझे गॉड फादर आहेत’ असेही म्हणताना माने प्रचंड भावुक होत ढसाढसा रडू लागला.
असा किरण माने त्याच्या चाहत्यांनी कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. सध्या घरात अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर आणि किरण माने हे स्पर्धक उरले आहेत. हा प्रत्येक स्पर्धक तोडीस तोड आहे आणि म्हणूनच तर बिग बॉस मराठीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. असे असले तरीही शेवटी हा एक खेळ आहे. त्यामुळे खेळाचा विजेता एकच होणार आणि बिग बॉस मराठी सीजन ४’ची ट्रॉफी कुणा एकाकडेच जाणार.. पण कोणाकडे..? हे ८ जानेवारी २०२३ रोजी ग्रँड फिनालेत समजेल.
Discussion about this post