हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अगदी तोंडावर आहे. या रविवारी दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी या पर्वाचा विजेता कोण ठरणार.? हे आपल्याला समजणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडल्यानंतर घरात ६ स्पर्धक राहिले होते. त्यातूनही काल आरोह वेलणकरचे मिड वीक एव्हिक्शन झाले आणि तो घराबाहेर पडला. त्यामुळे आता बिग बॉस मराठीला त्याचे टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. हे एव्हिक्शन झाल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने आणि अक्षय केळकर असे टॉप ५ स्पर्धक उरले आहेत.
कालचा बुधवार हा बिग बॉस मराठीच्या घरासाठी अत्यंत महत्वाचा आणि धक्कादायक ठरला. बिग बॉसने अचानक मिड वीक एविक्शन जाहीर करत घरातून एक सदस्य घराबाहेर पडणार असल्याचे सांगितले. यानंतर आरोह वेलणकरला एव्हीक्ट झाला आणि त्याला घराची वाट धरावी लागली. त्यामुळे आता १६ स्पर्धकांसोबत सुरु झालेला प्रवास ५ स्पर्धकांपर्यंत पोहोचला आहे. आता येत्या रविवारी या ५ स्पर्धकांमधून एकाची विजेता म्हणून निवड होईल आणि या पर्वाची सांगता होईल.
मिड एव्हिक्शनची घोषणा घरातील प्रत्येक सदस्याला धडकी भरवणारी होती. केवळ अपूर्वाला सोडलं तर इतर प्रत्येकाला घराबाहेर जाण्याची भीती सतावत होती. कारण अपूर्वाने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून आधीच टॉप ५ मध्ये जागा मिळवली होती. त्यामुळे अमृता, अक्षय, राखी, किरण आणि आरोह हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. यावेळी अमृता धोंगडे घराबाहेर जाण्याच्या भीतीने ढसाढसा रडली. तिला वाटलेलं कि तीच घराबाहेर जाईल. पण काल आरोह गेला आणि बिग बॉसच्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले.
Discussion about this post