हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक लोकांना एकहाती मदत करणारा अभिनेता सोनू सूद जगभरात मसीहा म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ कोरोना काळात नव्हे तर त्यानंतरही त्याचे समाज कार्य सुरूच आहे आणि यामुळे त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयाइतकेच त्याच्या माणुसकीचे चाहते अफाट आहेत. असे असताना सोनू सूद जे करेल त्याची नक्कल करणे किंवा त्याच आदर्शावर चालणे चाहत्यांसाठी सामान्य बाब आहे. पण सोनूच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करणे धोकादायक ठरायला वेळ लागणार नाही. अशाच एका कृतीसाठी सोनुने जाहीर माफी मागितली आहे.
प्रिय, @SonuSood
देश और दुनिया के लाखों लोगों के लिए आप एक आदर्श हैं। ट्रेन के पायदान पर बैठकर यात्रा करना खतरनाक है, इस प्रकार की वीडियो से आपके प्रशंसकों को गलत संदेश जा सकता है।
कृपया ऐसा न करें! सुगम एवं सुरक्षित यात्रा का आनंद उठाएं। https://t.co/lSMGdyJcMO
— Northern Railway (@RailwayNorthern) January 4, 2023
त्याच झालं असं कि, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा सोनू विविध पोस्ट शेअर करत असतो. तर काही दिवसांपूर्वी त्याने ट्विटरवर ‘मुसाफिर हूँ यारों’ या गाण्यावरील एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओमध्ये सोनू धावत्या रेल्वेच्या दारात बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्याला रिप्लाय देण्यात आला आहे. ज्यामुळे अभिनेत्याला त्वरित माफी मागावी लागली आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाने ट्विटमध्ये लिहिले कि, ‘प्रिय, सोनू सूद. देशातील आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. ट्रेनच्या पायऱ्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असं करु नका! सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.’
क्षमा प्रार्थी 🙏
बस यूँ ही बैठ गया था देखने,
कैसा महसूस करते होंगे वो लाखों ग़रीब जिनकी ज़िंदगी अभी भी ट्रेन के दरवाज़ों पे गुज़रती है।
धन्यवाद इस संदेश के लिए और देश की रेल व्यवस्था बेहतर करने के लिए। ❤️🙏 https://t.co/F4a4vKKhFy— sonu sood (@SonuSood) January 5, 2023
या रिप्लायनंतर सोनू सूदने रेल्वे प्रशासनाची माफी मागत ट्विट शेअर केले आहे. यात त्याने म्हटलं आहे कि, ‘क्षमस्व, जे लोक रेल्वेच्या दाराच्या जवळ आयुष्य जगतात, त्या लाखो गरीब लोकांना कसं वाटत असेल, हे पाहण्यासाठी मी तिथे बसलो होतो. या संदेशाबद्दल आणि देशाची रेल्वे व्यवस्था सुधारल्याबद्दल धन्यवाद.’ सोनू सुदने माफी मागितल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याने मांडलेल्या मुद्द्याचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी आजही आम्ही असाच त्रासदायी प्रवास करतो म्हणत रेल्वे प्रशासनाला सुरक्षित प्रवास म्हणण्यावरून टोकले आहे.
Discussion about this post