Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ कारणामुळे अक्षय कुमारने सोडला ‘गोरखा’; फर्स्ट लूकने वाढवली होती प्रेक्षकांची उत्सुकता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 5, 2023
in Breaking, Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Gorkha
0
SHARES
105
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा खिलाडी अलीकडेच हेरा फेरी ३ मध्ये काम करणार नसल्याचे समोर आले. यानंतर आता आणखी एका चित्रपटातून अक्षय कुमारने एक्झिट केल्याचे समजत आहे. गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ सालामध्ये अक्षय कुमारने ‘गोरखा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुकदेखील समोर आला होता आणि हा लूक पाहून त्याचे चाहते या चित्रपटाबाबत फारच उत्सुकदेखील होते. असे असताना आता असं अचानक काय झालं कि अक्षय कुमारने या चित्रपटाला राम राम ठोकला..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Sometimes you come across stories so inspiring that you just want to make them. #Gorkha – on the life of legendary war hero, Major General Ian Cardozo is one such film. Honoured to essay the role of an icon and present this special film.

Directed By – @sanjaypchauhan pic.twitter.com/4emlmiVPPJ

— Akshay Kumar (@akshaykumar) October 15, 2021

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे. मेजर जनरल इयान कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत- पाकिस्तान युद्धात विशेष कामगिरी बजावली होती. त्याच मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर ‘गोरखा’ हा चित्रपट आधारित आहे. त्यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार होता. मात्र समोर आलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार या चित्रपटातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत अक्षय कुमारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

It is official now. #AkshayKumar cancelled #Gorkha.#NNExclusive was in August. Fastest, Reliable. https://t.co/0yVBTuK6FO

— Nitesh Naveen (@NiteshNaveenAus) January 5, 2023

एका वृत्त माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या कथानकाच्या माध्यमातून मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनाबाबत विविध गोष्टी अक्षयच्या समोर आल्या. अक्षय कुमार भारतीय सैन्याच्या बाबतीत नेहमीच आदरार्थी राहिला आहे आणि यामुळेच चित्रपटातील काही गोष्टींमध्ये पारदर्शकता नसल्याने आणि काही योग्य तथ्य नसल्याने त्याने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. याआधी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वापरलेल्या ‘खुकरी’वरूनही बराच वाद निर्माण झाला होता. रिटायर्ड मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर अक्षयने प्रतिक्रिया देत ‘या चित्रपटाचे चित्रीकरण करताना याची अत्यंत काळजी घेऊ’ असे आश्वासन दिले होते.

Tags: akshay kumarbollywood actorTweeter PostUpcoming Bollywood MovieViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group