Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा गुपचूप साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 6, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Swanand Ketkar
0
SHARES
77
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तू तेव्हा तशी’ अगदी अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस ठरली. खूप काळ ट्रोलिंग नंतर शेवटी या मालिकेने आणि मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केलीच. या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत असले तरीही इतर सहाय्यक पात्रांच्या जोडीने कथानकाची मजा आणखीच फुलली आहे. तर या मालिकेतील नील हे पात्र साकारणारा अभिनेता स्वानंद केतकर याचा साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. या गोड क्षणाचे फोटो त्यानेच सोशल मीडियावर शेअर करत हि माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Swanand Ketkar (@swanand.ketkar)

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपापले जोडीदार निवडून लग्न गाठ बांधली आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटीची लगीनघाई सुरूच आहे. यात आता अभिनेता स्वानंद केतकरचाही लवकरच समावेश होणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेतून नील म्हणून घराघरात पोहोचलेला स्वानंद केतकर बऱ्याच तरुणींचा क्रश झाला आहे. असे असताना त्याच्या साखरपुड्याची बातमी वाचून किती तरुण हृदय तुटले असतील.

View this post on Instagram

A post shared by Akshata Apte (@akshataapte)

पण स्वानंदने मात्र अक्षता आपटेसोबत मन जोडलं आणि ४ जानेवारी २०२३ रोजी साखरपुडा उरकून घेतला. सोशल मीडियावर त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीसह काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कमेंट करत त्याच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Swanand Ketkar (@swanand.ketkar)

माहितीनुसार, अभिनेता स्वानंद केतकर आणि अक्षता आपटे हे गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांसोबतचे विविध फोटो शेअर करताना दिसायचे. स्वानंदची होणारी बायको अर्थात अक्षता आपटे हीसुद्धा एक अभिनेत्री आहे. शिवाय ती एक उत्तम कवयित्रीदेखील आहे. तर स्वानंद अभिनय क्षेत्रात छोट्या पडद्यावर अभिनेता म्हणून कार्यरत आहे. या नव्या वर्षात स्वानंद आणि अक्षयाने त्यांच्या नव्या इनींगला सुरुवात केली आणि यासाठी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

Tags: Got engagedInstagram PostTu Tevha Tashi FameViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group