हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं ट्रेंडिंग जोडपं अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचं लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांची हवा आहे. सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात आणि चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत असतात. अलीकडेच नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हे जोडपं रणथंबोरच्या जंगल सफरीवर गेल्याचे दिसून आले. यानंतर आता कॅटरिना तिचा पती विकी कौशल आणि सासूबाईंसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नानंतर कॅटरिनाचं आयुष्य बरंच बदललं आहे. लग्न, लग्नानंतरचे विधी आणि विविध सण ती आपल्या कुटुंबासोबत साजरे करताना दिसते. प्रत्येक सणाचे खास फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दिवाळी, करवा चौथ आणि अगदी ख्रिसमस सेलिब्रेशनचेदेखील फोटो कॅटरिनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आज कॅटरिना कैफ- कौशल, विकी कौशल आणि त्याची आई हे एकत्र मुंबईतील प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या आशीर्वादासाठी पोहोचले होते.
सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. काही इंस्टा पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये विकी, कॅटरिना आणि तिच्या सासूबाई बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी विकीने सदरा पायजमा परिधान केला होता. तर कॅटरिनाने पंजाबी सूट परिधान केला होता. या जोडप्यामागे भाविकांची मोठी गर्दीदेखील दिसत आहे. विकी आणि कॅटरिनाने नव्या वर्षात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. या फोटोंवर अनेकांनी कमेंट करीत कॅटरिना हिंदू धर्माचे पालन करत आहे याबाबत आनंद व्यक्त केला आहे. काहींनी अशी सून सगळ्यांना मिळावी अशाही कमेंट केल्या आहेत.
Discussion about this post