हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टेलिव्हिजन पदड्यावरील लोकप्रिय जोडपे राणा दा आणि पाठक बाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे सतत चर्चेत असतात. गेल्या २०२२ वर्षातील भव्य आणि दिमाखदार लग्न सोहळ्यांमध्ये हार्दिक आणि अक्षयच्या लग्न सोहळ्याचा देखील समावेश आहे. पुण्यात नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर देवदर्शन आणि आता गोवा ट्रिपचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर त्यांच्या सुखी संसारात एकमेकांच्या रंगात रंगले आहेत. यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयाने सोशल मीडियाद्वारे एक खास पोस्टदेखील शेअर केली होती. लग्नानंतर आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना एकमेकांसाठी फार वेळ काढणे शक्य झाले नसले तरीही आता हे जोडपं जीवाचा गोवा करताना दिसत आहेत. आपल्या व्यस्त शेड्युलमधून शेवटी याना एकमेकांसाठी वेळ मिळालाच आणि ते थेट एकांताची गोव्याला पोहोचले आहेत.
लग्न झालं, पूजा झाली, देवदर्शन झालं पण तरीही हार्दिक आणि अक्षया हनिमूनसाठी म्हणून कुठे गेलेच नाहीत. अलीकडेच एका मुलाखतीत हार्दिकने म्हटले होते कि, मी कामामध्ये व्यग्र आहे पण वेळात वेळ काढून अक्षयाला फिरायला नेणार आहे. यानंतर आता दोघांचे निवांत आणि एकांताचे क्षण ते एन्जॉय करत आहेत. अक्षयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून गोव्यामध्ये चालू असलेली मजामस्ती आणि काही क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही गोव्याच्या रस्त्यावर बसले आहेत. गोव्यात सनसेट एन्जॉय करत आहेत. एकमेकांकडे पाहून जगाला विसरून फक्त एकमेकांमध्ये विलीन झाले आहेत. सेलिब्रिटी असूनही इतक्या साध्या पद्धतीने आयुष्य व्यतित करणाऱ्या या जोडप्याचे सोशल मिडीआयवर कौतुक केले जात आहे.
Discussion about this post