Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ॲक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीचा शूटिंग सेटवर अपघात; जखमी अवस्थेत दाखल केले रुग्णालयात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rohit Shetty
0
SHARES
88
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘खतरों के खिलाडी’ शोचा होस्ट आणि बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील ऍक्शन चित्रपटांचा कर्ता धर्ता अशी ओळख असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी कॉप वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. हे शूटिंग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरु आहे. याच शूटदरम्यान रोहित शेट्टीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. रोहित शेट्टी त्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत असताना हा अपघात झाल्यामुळे त्याची टीम आणखीच चिंतेत आहे.

#RohitShetty has got some minor injury on his fingers while executing an action sequence for his upcoming web series #IndianPoliceForce last night. The injury was immediately treated. And, he resumed his shooting shortly after the incident. Get well soon, Rohit! pic.twitter.com/n6Og5b45Iq

— Boxoffice Tracker (@Abhishek240988) January 7, 2023

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठी त्याची आगामी कॉप वेब सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’ अत्यंत महत्वाची आहे. हि वेब सिरीज तिच्यासाठी त्याचं स्वप्न आहे. या सीरिजचे शूट गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याच शूटिंग दरम्यान कार चेस सिक्वेन्स शूट करताना रोहित शेट्टीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

हा अपघात होताच प्रॉडक्शन टीमने त्याला कामिनेनी हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल केले. तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रोहित शेट्टीची तपासणी केली आणि यानंतर तात्काळ त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया झाली असली तरी रोहित शेट्टीला त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. माहितीनुसार, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र काही दिवस त्याला पूर्ण सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

बॉलिवुड सिनेविश्वात रोहित शेट्टी हा त्याच्या दमदार अॅक्शन ड्रामा चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे कार डॅश, उडणाऱ्या गाड्या, हवेतल्या बाईक आणि हेलिकॉप्टरवर फाईट हमखास दिसणार याची प्रेक्षकांनाही खात्री असते. चित्रपटात गाड्या एकमेकांवर आदळतात काय… तुटतात काय आणि फुटतात काय. हे सगळं रोहित शेट्टीसाठी डाव्या हाताचा मळ झाला आहे. पण त्याची हि ऍक्शनची आवड त्याला यावेळी चांगलीच नडली आहे. अलीकडेच रोहित शेट्टीने सिंघम चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे त्यामुळे रोहितने लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

Tags: Indian Police ForceInjured During ShootInstagram Postrohit shettyUpcoming Web Seriesviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group