हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील कमाल आणि धमाल अभिनेता स्वप्निल जोशी हा वय वाढत असलं तरीही लाखो तरुणींचा लाडका अभिनेता आहे हे काही वेगळे सांगायला नको. त्याच्या प्रत्येक लूकवर तरुणी फिदा असतात. एक नट, एक कलाकार आणि चाहत्यांचा लाडका अभिनेता म्हणून जगण्याव्यतिरिक्त स्वप्निल त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक नाती जबाबदारीने निभावतोय. मित्र, मुलगा, नवरा आणि बाबा… जो जितका उत्तम अभिनेता आहे तितकाच उत्तम फॅमिली मॅन आहे. आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारा आणि मुलांसोबत लहान होणारा स्वप्निल आपल्या लेकीने साडी नेसली आहे हे पाहून भावुक झालाय. त्याने एक पोस्ट शेअर करत स्वतःसोबत इतरांनाही भावुक केलं आहे.
सर्वांचा आवडता स्वप्निलत्याच्या लेकीचाही फेव्हरेट आहे बरं का.. त्यामुळे अनेकदा स्वप्निल त्याची लेक मायरा हिच्यासोबत धमाल, खोड्या, मस्ती करताना दिसतो. अनेकदा तो व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांनाही आपल्या आयुष्याचा भाग बनवीत असतो. तुम्ही जर मुलगी असाल किंवा तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही हे जास्त चांगलं जाणू शकता कि प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हिरोपेक्षा कमी नसतो. त्यामुळे मायराचा बाबा तिच्यासाठी नेहमीच सुपरहिरो राहिला आहे. धमाल मस्ती करता करता आज अचानक मायरा मोठी झाली का काय..? असे भासवणारा एक प्रसंग घडताच स्वप्निलमधला बाबा भावुक झाला.
अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि म्हणूनच त्याने इंस्टाग्रामवर त्याची लेक मायरासाठी हि पोस्ट शेअर केली आहे. स्वप्निलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वप्निलची छोटीशी मायरा पारंपरिक वेषभूषेत दिसतेय. यात तिने काठा पदराची साडी परिधान केली आहे आणि थोडीफार ज्वेलरीसुद्धा परिधान केली आहे. यामध्ये ती फारचं गोड दिसते. सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘मायरा…अचानक मोठी झाली यार’. या एका वाक्यात लेक मोठी झाल्यावर बापाच्या काळजाला काय वाटत ते सगळं स्वप्निल बोलून गेलाय. यावर नेटकरी आणि अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी म्हटलंय कि, ‘मुली अशाच पटकन मोठ्या होतात बापाला कळत पण नाही आणि जातात नवऱ्याच्या घरी. वाईट पण खरे आहे’. आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘मुलीने शाळकरी वयात असताना अशी साडी नेसली की बापाच्या काळजाचा ठोका च चुकतो..’
Discussion about this post