हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी एखाद्या स्टेटमेंटमुळे, तर कधी बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली म्हणून. पण अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी यांनी लग्न केलं आहे. म्हटली जाणारी टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या बाहेर आल्यापासून चर्चेत आहे.आता तिच्याशी संबधित एक मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे.
खरंतर राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी सीजन ४ मुळे चर्चेत राहिली आहे. या सिजनच्या टॉप ५ मध्ये येऊन राखीने ९ लाख रुपये स्वीकारून घराबाहेर पडणे पसंत केले. पण राखीने हे ९ लाख रुपये का घेतले..? तर आईच्या आजारपणाचा खर्च काढता यावा म्हणून राखीने हे पैसे स्वीकारून बिग बॉसचे घर सोडले होते.
एकीकडे आई हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारपण काढते आहे आणि दुसरीकडे राखीने लग्न केलं..? या प्रश्नाने सगळेच हडबडले. याला सुखद धक्का म्हणावं तरी कसं..? पण जेव्हा राखी आणि आदिल यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा मॅरिज सर्टिफिकेटवर २०२२ मधील तारीख दिसली. याचा अर्थ राखी आणि आदिल यांनी गेल्याचवर्षी लग्न केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आदिल आणि राखी गळ्यात वरमाला घालून फोटोसाठी पोज देताना दिसले आहेत. शिवाय त्यांच्या हातामध्ये मॅरिज सर्टिफिकेटसुद्धा दिसत आहे. ज्यावर २०२२ वर्षातील तारखेची नोंद आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार, आदिलने तिची फसवणूक केली आहे. आदिलचे दुसऱ्या मुलीशी सध्या अफेअर सुरू असून त्याने तिच्याशी लग्नही केले आहे. तसेच आता लग्नानंतर तो दुसऱ्या मुलीसोबत राहत आहे. आदिलचं हे सत्य समोर आल्यानंतरच राखीने तिच्या लग्नाचं सत्य सर्वांसमोर आणलं. आदिलने निकाहनंतर राखीचं नाव फातिमा ठेवल्याचेही तिने सांगितले.
लग्नाचे सत्य राखीने समोर आणले असता आता आदिलने निकाहच्या वृत्ताचे खंडन केले आहे आणि राखीशी अजून लग्न न केल्याचं सांगितलं आहे. एकीकडे राखीने पुराव्यानिशी लग्नाचे सत्य समोर आणले आहे, शिवाय प्रेमासाठी धर्म बदलला आहे आणि दुसरीकडे आदिल थेट तिच्या प्रेमाचा अपमान करतो आहे. यामुळे खरंच राखीला लव्ह जिहादची जी भीती वाटत आहे ती खरी होताना दिसते आहे.
Discussion about this post