Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तिळगुळ घ्या गोडगोड बोला!! भाऊजींसोबत साजरी होणार हार्दिक- अक्षयाची पहिली मकर संक्रांत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 14, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hardeek_Akshaya
0
SHARES
5.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून वसलेली जोडी अर्थात राणा दा आणि पाठक बाई हे खऱ्या खुऱ्या आयुष्यात एकमेकांच्या रंगात रंगले आहेत. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी रील लाइफनंतर आता रिअल लाईफमध्येही एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या वर्षी २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामध्ये यांचा पारंपारिक शाही विवाह सोहळा पार पडला. यंदाची मकर संक्रांत हि दोघांची पहिली संक्रांत आहे आणि त्यामुळे ती खास बनवण्याची जबाबदारी आदेश भावजींनी घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

हार्दिक आणि अक्षयाची पहिली मकर संक्रांत गोड करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील हलके फुलके मजेशीर प्रसंग प्रेक्षकांना सांगण्यासाठी ते झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत ते आपल्या परिवारासोबत आणि झी सोबत साजरा करणार आहेत. होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिला वर्गात विशेष लोकप्रिय आहे. कारण देशभरातील कित्येक वहिनींचे पैठणीचे स्वप्न या कार्यक्रमाने पूर्ण केले आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

जसे आदेश भाऊजी सगळ्यांचे लाडके आहेत. तसेच राणादा आणि अंजलीबाईसुद्धा प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे या संक्रांतीचा हा विशेष भाग प्रचंड गाजणार आहे. या भागासाठी अक्षयाने काळ्या रंगाची काठा पदराची साडी नेसली आहे. तर हार्दिकने काळा कुर्ता परिधान केला आहे. यावेळी अक्षया आणि हार्दिक वेगवेगळे मजेशीर खेळ खेळताना दिसतील. इतकेच नव्हे तर खूप गप्पा, मजेशीर प्रसंग, प्रेमाच्या गोष्टी असं बरंच काही या भागात आहे. तसेच कार्यक्रमाच्या फॉरमॅटनुसार आदेश बांदेकर अक्षयाला एक पैठणी देखील भेट देणार आहेत. हा एपिसोड १५ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांती निमित्त दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे.

Tags: Aadesh BandekarAkshaya DeodharHardeek JoshiHome MinisterInstagram Postzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group