हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेले तीन महिने प्रचंड चर्चेत राहिली आहे. बिग बॉसच्या घरातील १०० दिवसांचा टप्पा पार करून रनरअप ठरलेली अपूर्वा भले खेळात हरली असेल पण प्रेक्षकांची मनं तिने जिंकली. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून शेवंता हे पात्र साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात आधीच एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनतर बिग बॉस मराठीच्या घरातील सहभागामुळे ती आणखीच चर्चेत आली. यांनतर आता लवकरच ती एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. यामुळे ती कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विविध लूक शेअर करत ती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडे बिग बॉसचा खेळाची सांगता झाल्यानंतर आता अपूर्वा पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असा सवाल पडण्याआधीच तिने एक घोषणा केली आहे. लवकरच अपूर्वा एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार असून याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
स्वयंभू स्टुडिओज निर्मित ‘द डिलिव्हरी बॉय’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री करण्यापूर्वीच तिने या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले होते. याआधी अपूर्वा नेमळेकरने विविध मालिका आणि काही नाटकांमध्ये काम केले आहे. ‘आभास हा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता साकारल्याने तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून त्याचा फायदा तिला आगामी काळातील प्रोजेक्ट्ससाठी नक्कीच होऊ शकतो.
Discussion about this post