हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद याने कोव्हीड काळात लोकांची मदत करून मसीहा टॅग मिळवला आहे. पण त्याच हे मदत कार्य केवळ तेव्हढ्याच काळापुरता मर्यादित राहिलेलं नसून तो अविरत हे कार्य पुढे करत आहे. आजही कुणाला मदत लागली आणि तो सोनूपर्यंत पोहोचला तर त्याला मदत केल्याशिवाय तो मागे फिरत नाही. त्यामुळे सोनू सून अभिनयासाठी जितका प्रसिद्ध आहे त्याहून जास्त समाज कार्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत काही पारंपरिक कला जोपासणारे कलाकार दिसत आहेत आणि सोनू त्यांच्या सुरात सूर मिसळतोय.
अभिनेता सोनू सूदने हा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. ज्यात त्याने म्हटलंय कि, ‘आपल्या देशात खूप प्रतिभा आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणे खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला तुमची गायन कौशल्ये ब्रश करायला मदत करतात.’ सोनू सूदचा हा सुरीला अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड भावला आहे. खरंतर हा व्हिडीओ त्याने साधारण तीन दिवसांपूर्वी शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय कि बस्स..
या व्हिडीओमध्ये सोनू सूद पारंपरिक कला जोपासणाऱ्या देसी कलाकार मंडळींसोबत हार्मोनिअम अर्थात बाजाची पेटी वाजवताना दिसतो आहे. इतकेच काय तर तर त्यांच्या सुरात सूरदेखील मिसळतो आहे. हे कलाकार ‘आओ नी पधारो मारे देस’ हे गाणे गात आहेत आणि सोनू त्यांच्यासोबत गाण्याचा प्रयत्न करत एन्जॉय करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोनूचे चाहते म्हणत आहेत कि, ‘एकच हृदय आहे कितीवेळा जिंकशील..?’ अनेकांनी सोनूचा हा अंदाज आपल्याला पसंत पडल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post