Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘I am गौरव मोरे…’; दुबईत पोहोचला फिल्टरपाड्याचा छावा.. आणखी काय पाहिजे भावा!!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gaurav More
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हटके अंदाज आणि अफलातून टायमिंगच्या जोरावर ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलाय तो हास्यवीर गौरव मोरे प्रेक्षकांना प्रचंड लाडका आहे. सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सगळ्यांच्या मनात एक भक्कम जागा मिळवली. प्रेक्षकांना लोटपोट करून खदाखदा हसवणारा गौरव आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर परदेशातही आता फिल्टरपाड्याचा बच्चन गाजतोय. गौरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची झलक दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा केवळ चाहत्यांच्या प्रेमापोटी परदेश दौऱ्यावर गेला. यानिमित्त या कार्यक्रमाचे हास्यवीर दुबईमध्ये हास्याचे फटाके फोडताना दिसले. त्यांनी आपल्या अफलातून विनोद शैलीने दुबईकरांनाही लोटपोट केलं. यावेळी गौरवला दुबईकरांनी इतकं भरभरून प्रेम दिल कि तो भारावून गेला. प्रेक्षकांचं प्रेम, प्रतिसाद आणि त्यांचा उत्साह संपूर्ण एखाद्या स्वप्नासारखं वाटत होत. तर दुबईच्या रंगमंचावर जेव्हा गौरव मोरे येतो.. तेव्हाच एक व्हिडीओ त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

दुबईच्या कार्यक्रमात गौरव विंगेतून चालत रंगमंचावर येतो आणि उभा राहतो. तर सर्वत्र केवळ “गौरव गौरव” असा जल्लोष सुरु होतो. या प्रेमासाठी काय आणि कसे आभार मानावे असे म्हणत गौरवने हि व्हिडीओ पोस्ट केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहीलंय कि, ‘एक कलाकार म्हणून अजून काय पाहिजे….? मला फार बोलता येत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलंत, करताय त्याचं ऋण कसं फेडावं…? हे काही मला सूचत नाहीये…फ़क़्त एवढच बोलू शकतो…मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद दुबई…love you’. या व्हिडिओत जेव्हा गौरव म्हणतो.., ‘आय एम गौरव मोरे.. फ्रॉम …’ यावर गौऱ्याआधी प्रेक्षकचं म्हणतात पवई फिल्टरपाडा. त्यानंतर मग टाणाणा..टाणाणा. गौऱ्याचा हा अंदाज प्रेक्षकांना तुफान आवडतोय आणि या व्हिडिओवर अनेकांनी गौरवला आणखी मोठा स्टार म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Tags: Gaurav MoreInstagram PostMaharashtrachi hasyajatraSony MarathiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group