हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. लोकप्रिय मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होता. मध्यंतरी मालिकेतील कलाकारांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने मालिकेच्या टीआरपीला मोठा फटका लागला आणि हि मालिका थेट प्रवाह दुपार मध्ये प्रसारित होऊ लागली.
मात्र मालिकेचे कथानक पुढे काय होईल..? हि उत्सुकता काही संपू देत नव्हतं. त्यामुळे प्रवाह दुपार मध्ये देखील या मालिकेने आपले अढळ स्थान प्रेक्षकांच्या मनात बनवले. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला आहे आणि यांनतर आता मालिकेत शौनक हि भूमिका साकारणाऱ्या योगेशने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
या मालिकेतील माऊ आणि शौनकची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शौनक हे पात्र अभिनेता योगेश सोहोनीने साकारले होते. या भूमिकेमुळे योगेशला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे भावुक होत त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिलंय कि, ‘आज “मुलगी झाली हो” या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. ७०० हुन अधिक भागांचा हा अविस्मरणीय प्रवास थांबला. थांबला म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, कारण जे कुठेतरी थांबलय ते कुठेतरी नव्याने सुरू होणार आहे. आज हे लिहिताना शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, घटना, किस्से, प्रसंग, डोळयांसमोर आले.’
‘हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या, अप्रिय घटना घडल्या, न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले त्याचबरोबर असंख्य चांगली, प्रेमळ माणसे (कलाकार) भेटले आणि ते आयुष्याचा एक भाग होऊन गेले. शौनक ही व्यक्तिरेखा साकारताना मला या घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा, भेटलेल्या माणसांचा, त्यांच्या आलेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला. Instagram इतकं ऍडव्हान्स असलं तरी शब्द मर्यादा आणि फोटो अपलोड करायला देखील मर्यादा आहेत हे दुर्दैव आहे. हे मला ३-४ तास मेहेनत करून जो Write Up लिहिला आणि तो अपलोड करायला गेलो तेव्हा कळलं…. असो मार्क झुकरबर्ग जेव्हा हा प्रोब्लेम सोडवेल तेव्हा सोडवेल, पण या मार्यादेमुळेच मला सगळ्याची नावं इच्छा असूनही लिहिता येत नाहीयेत याच वाईट वाटतय.’
‘पण मीही खूप चिवट आहे, सगळी नाव जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचे आभार मानत नाही तो पर्यंत मला चैन पडणार नाही. तर माझ्या फेसबुक वरील पोस्ट मध्ये त्या सगळ्यांबद्दल लिहून आभार मानले आहेत ते जरूर वाचा, फेसबुक ची लिंक Bio मध्ये देत आहे. ते वाचून मायबाप रसिक प्रेक्षकांना कळेल की किती माणसे एखाद्या प्रोजेक्टशी निगडित असतात आणि त्याच योगदान किती महत्त्वाच असतं. लवकरच एका वेगळ्या मालिकेत, वेगळ्या भूमिकेत भेटू तोपर्यंत पुनरागमनायच……योगेश माधव सोहोनी.’
Discussion about this post