हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून ‘इन्स्पेक्टर विजय भोसले’ हे पात्र साकारणारा अभिनेता हरिश दुधाडे चांगलाच प्रकाशझोतात आला. शिवाय ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटातील त्याने साकारलेली ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिकादेखील विशेष गाजली. यामुळे सध्या हरिश दुधाडेचा चाहता वर्ग विस्तारताना दिसतो आहे. अशातच त्याच्या ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने काहीसे भावुक होत त्याने या प्रवासाविषयी बोलणारे एक पत्र शेयर केले आहे. यामध्ये त्याने मालिकेच्या यशामागील प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे.
हि पोस्ट शेअर करताना हरीशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आजवर अनेक मालिका केल्या आणि करत राहू, पण ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका माझ्या आयुष्यात खास जागा करून गेली. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे “इन्स्पॅक्टर विजय भोसले”. पोलिसांची भूमिका करणं माझं स्वप्न पूर्ण झालं . एका वेगळ्या धाटणीचा भोसले साकारताना भूमिका उभी रहाताना लागलेले हात विसरून कसं चालेल.. ? सर्व प्रथम सोनी मराठी.. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सूर्यभाननंतर अवघ्या ३ महिन्यात तुम्ही मला तयार व्हायला सांगितलं ते भोसलेसाठी आणि स्ट्रॉबेरी पिक्चर्स.. माझं तुमच्याशी असलेलं नातं जूनं आणि आपुलकीचं आहे त्यामुळे तुमचा फोन आणि मी विचारावं “कधीपासून..?” एवढंच काय ते संभाषण होत आपल्यात कायम..’
पुढे लिहलंय, ‘मनवा नाईक.. “सरस्वती, तू सौभाग्यवती हो, शिवप्रताप, तुमची मुलगी काय करते, काळीराणी” मला वाटतं एवढ्या नावांमधेच कळते आपली chemistry.. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली एक कमाल व्यक्ती. “माणूस चांगलं असावं” अस सतत तू सांगतेस आणि तसं जगतेस. Respect आणि मनापासून आभार, या भूमिकेसाठी मला निवडलंस. चिन्मय मांडलेकर.. राजे .. तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक sceneला जागण्याचा प्रयत्न मी केला. मी स्वतःला नशीबवान समजतो की back to back दोन मालिकांमधून मी तुमच्या बरोबर काम केलं. मुग्धा गोडबोले.. तुझ्याबद्दल काय बोलू .. भोसले या पात्राला बोलतं करण्याचं काम तुझं. तुझ्या संवादांवर उभा राहिला भोसले . तुझा माझ्यावरचा विश्वास “शिरसावंद्य”. मैत्रिणतर तू आहेसच पण त्याहीपेक्षा तू कमाल माणूस आहेस . पुढच्या पर्वात भेटूच , पण तुमची मुलगी काय करते.. कायम स्मरणात राहिल तुम्हा सर्वांमुळे….तुमचाच, हरीष दुधाडे.’
Discussion about this post