हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘अति तिथे माती’ हि म्हण तुम्ही ऐकली असेल ना.. या म्हणीचा अर्थही तुम्हाला ठाऊक आहे. पण बहुतेक सोनी सेट मॅक्स वाहिनीच्या संचालक वर्गाला हि म्हण माहित नाही. म्हणूनच तर या वाहिनीवर वारंवार कित्येक वर्ष ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट कालच रिलीज झाल्यासारखा प्रसारित केला जातो. हा चित्रपट रिलीज होऊन आता २४ वर्ष होऊन गेली पण सोनी सेट मॅक्सचं या चित्रपटावरील प्रेम काही केल्या कमी होईना. शेवटी एका व्यक्तीने या संबंधित एक पत्र थेट चॅनलला लिहिलंय आणि मी वेडा झालो तर तुम्ही जबाबदार असे त्याने म्हटले आहे.
‘सूर्यवंशम’ हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, दिवंगत साऊथ अभिनेत्री सौंदर्या, अनुपम खेर, दिवंगत अभिनेता कादर खान हे कलाकार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी भानु प्रतापची भूमिका साकारली होती. जी प्रचंड गाजली. म्हणून का काय. पण सोनी सेट मॅक्सने वाहिनी चालू असेपर्यंत हा चित्रपट चालू ठेवण्याची जणू शपथचं घेतली आहे. त्यामुले प्रत्येक विकेंड, प्रत्येक हॉलिडेला हा चित्रपट प्रसारित केला जातो. इतकेच काय तर कहर म्हणजे आयपीएल क्रिकेट सुरु असली तरीही हा चित्रपट प्रसारित होतो. शेवटी वाहिनीच्या जाचाला कंटाळून डि.के पांडे नामक एका व्यक्तीने सोनी सेट मैक्स चॅनलला पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी लिहिलंय कि, ‘सोनी सेट मॅक्स चॅनलला सूर्यवंशम चित्रपटाची ठेकेदारी मिळाली आहे. तुमच्या कृपेने आम्ही आणि आमचे कुटुंब हिरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाला (राधा, गौरी आणि इतर) चांगल्या प्रकारे ओळखू लागलो आहोत. आम्हाला सूर्यवंशम नामक चित्रपटाची एक्स्ट्रा इनिंग पाहून पाहून आता कंठस्थ (लक्षात राहणे) झाली आहे. मला तुमच्या चॅनलकडून हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्या चॅनलने हा चित्रपट आतापर्यंत किती वेळा प्रसारित केला आहे..? भविष्यात हा चित्रपट आणखी किती वेळा प्रसारित होणार आहे…? त्याचा विपरीत परिणाम (वेडेपणा) माझ्या मानसिक स्थितीवर झाला तर त्याला जबाबदार कोण.. ? कृपया मला कळवण्याचे कष्ट घ्या.. – प्रामाणिक ‘सूर्यवंशम’ पीडित’ सध्या हे पत्र सोशल मिडिऑयावर तुफान व्हायरल होत आहे आणि अनेक मिम्सचा पाऊसदेखील पडत आहे.
Discussion about this post