हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचं बिग बॉसचं १६ वं पर्व कमाल गाजताना दिसत आहे आणि याच कारण आहे घरातील सदस्य. प्रत्येकाने इथे काही ना काही नाती जोडली आहेत तर काहींनी काहींची नाती तोडली आहेत. या घरात एक जोडी असली कि नकली..? या प्रश्नावरून वारंवार चर्चेत राहिली आणि ती जोडी म्हणजे टीना दत्तासोबत शालीन भनोत. पण फॅमिली विकनंतर या जोडीमध्ये वारंवार भांडण होताना दिसत आहे. यावेळी त्यांच्यामध्ये असं भांडण झालं कि टीना थेट शिवीगाळ आणि हातापाईवर उतरली. नक्की काय झोंबलं म्हणून टीना आणि शालीन इतके भांडले..?
एका वेळेला बिग बॉस १६ च्या घरातले लव्ह बर्ड्स म्हणून टीना आणि शालीन ओळखले जात होते. पण आजकाल यांचं वैर काही औरच दिशेला चाललं आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करताना दिसू लागले आहेत. सध्या घरात तिकीट टू फिनाले विक सुरु आहे आणि यामध्ये ‘बिग बॉस’ने निमृतला कॅप्टन बनवलं आहे. तिची कॅप्टन्सी काढून घेऊन अन्य कोणताही सदस्य तिकीट टू फिनाले जिंकू शकतो.
या संधीसह एक टास्क बिग बॉसने सदस्यांना दिला आणि यावेळी निमृतच कॅप्टन रहावी, असे शालीन म्हणाला. हे ऐकून प्रियांका आणि टीना त्याच्यावर चांगल्याच भडकल्या. यावेळी टीना, शालीन आणि प्रियांकामध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. पण या भांडणात शालीन असं काही बोलून गेला कि टीना थेट त्याच्या कानफाडात मारायला धावली.
कलर्सच्या व्हायरल प्रोमो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि शालीन टीनाला म्हणतो, ‘सगळं प्लॅनिंग तू केलंयस. तू किती खोटारडी आहेस. एक मुलगा तुला सोडून गेला की तू दुसऱ्या मुलाला चिकटतेस.’ हे ऐकून टीनाला राग येतो आणि ती म्हणते, ‘तोंड सांभाळून बोल. स्वतःच्या बायकोची इज्जत ठेवू शकत नाहीस तू माझ्या चारित्र्यावर बोलत आहेस. घाणेरडा मुलगा.. मला फरक पडत नाही. असलं काही बोललास तर तुझ्या कानाखाली मारेन.’ यावर शालीन म्हणतो, ‘तुझं हेच सत्य आहे’. यानंतर टीना मोठमोठ्याने भांडताना दिसते आणि म्हणते ‘आता माझ्या व्यक्तित्वावर, चारीत्यवर येतंय बिग बॉस… मला याच आठवड्यामध्ये घराबाहेर जायचं आहे’. शालीन आणि टीनाच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे. काही नेटकरी हे सुद्धा नकली आहे असे म्हणत आहेत.
Discussion about this post