हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त परेश मोकाशींच्या ‘वाळवी’ची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या कथानकाच्या प्रेक्षक, समीक्षक आणि दिग्गज मंडळींवर जणू जादू केली आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. अगदी ‘असा चित्रपट आजवर मराठीत झाला नाही’ असे म्हणत त्यांनी कलाकार, लेखक, दिग्दर्शक अशा वाळवीच्या पूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
‘वाळवी’ हा चित्रपट प्रत्येक चित्रपटरसिकाने आवर्जून पहावा असा आहे. इतका उत्कंठावर्धक चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा प्रत्येक बाबतीत या चित्रपटाने अव्वल कामगिरी केलेली आहे. परेश मोकाशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन #ZeeStudios pic.twitter.com/d6kMdtlhAU
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 18, 2023
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. हे ट्विट करीत त्यांनी लिहिलंय कि, ‘ ‘’वाळवी” हा चित्रपट प्रत्येक चित्रपट रसिकाने आवर्जून पहावा असा आहे. इतका उत्कंठावर्धक चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा प्रत्येक बाबतीत या चित्रपटाने अव्वल कामगिरी केलेली आहे. परेश मोकाशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन!!’. फक्त अमेय खोपकरचं नव्हे तर मंदिरातही मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील परेश मोकाशी यांनी समर्थपणे पेलली आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय उद्या सिनेमा लव्हर्स डेनिमित्त ‘वाळवी’ पाहण्यासाठी एक स्पेशल ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ती अशी कि, २० जानेवारी २०२३ रोजी ‘वाळवी’ हा चित्रपट फक्त ९९/- रुपयांत पाहता येणार आहे.
Discussion about this post