Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चंद्राने लावले अमृताच्या कारकिर्दीला चार चाँद; प्रेक्षकांनी दिला फेव्हरेट अभिनेत्रीचा बहुमान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 20, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
266
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण..?’ या पुरस्कारांबाबत उत्सुकता लागली आहे. यात महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण होणार.? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता हे नाव समोर आले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ठरली आहे महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री. गेल्यावर्षी आलेल्या चंद्रमुखी चित्रपटात अमृताने साकारलेल्या ‘चंद्रा’ची प्रेक्षकांवर भारी भुरळ पडली आहे. याच भूमिकेमुळे तिला हा सन्मान मिळाला आहे. अमृता आधीच अत्यंत लोकप्रिय असली तरीही तिच्या आयुष्यात चंद्रा आली आणि तिच्या कारकिर्दीला चार चाँद लागले.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

झी टॉकीज वाहिनीतर्फे १५ डिसेंबर २०२२ रोजी ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्काराची नामांकने जाहीर करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण..? या विभागात सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, अमृता खानविलकर, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश होता. या पुरस्कारासाठी या अभिनेत्रींमध्ये चुरस रंगली. पण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी हा बहुमान अमृताला दिला आणि ती ठरली महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री. अमृता खानविलकरला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा या भूमिकेसाठी हे नामांकन मिळाले होते.

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटातील लावणी कलावंतीण ‘चंद्रा’ अमृताने इतकी उत्कृष्ट साकारली कि मनामनांत वसली. अमृताच्या कारकिर्दीला हि भूमिका फार मोलाचे वळण देऊन गेली. आजपर्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसलेली अमृता तिच्या अभिनयाइतकीच उत्तम नृत्य शैलीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. वाजले कि बारा.. या लावणीनंतर अमृताने भल्या भल्या अभिनेत्रींचे बारा वाजवले. त्यामुळे चंद्रा साकारताना ती लकब मुळातच अमृतामध्ये होती जी प्रसादने ओळखली आणि अख्ख्या महाराष्ट्राला ओळख करून दिली त्यांच्या फेवरेट अभिनेत्रीची. हा पुरस्कार सोहळा नुकताच चित्रित करण्यात आला असून लवकरच झी टॉकीजवर प्रसारित केला जाईल.

Tags: Amruta KhanvilkarInstagram PostMaharashtracha Favourite Kon?viral postzee talkies
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group