Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अवधूत गुप्तेचा बदामी बाण प्रेक्षकांच्या काळजात रुतला; एका दिवसात 5 लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bamboo
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कधी, कुठे आणि कसं प्रेम होतं..? हे कधीच, कुणालाच कळत नाही. पण प्रेमात पडल्यावर मात्र बरोबर कळतं कि कोणी कधी आणि कसे ‘बांबू’ लावलेत. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमचं.. असतं, तुमचं आमचं सेम नसलं तरी बांबू लावणारं असतं. आपल्या आजुबाजुला अनेक जण आहेत, ज्यांचे प्रेमात एकदा तरी ‘बांबू’ लागले आहेत. तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा हा ‘बांबू’ येत्या २६ जानेवारीला महाराष्ट्रात लागणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणे महाराष्ट्राचा लाडका रांगडा गायक अवधूत गुप्ते याने गायले आहे.

समीर सप्तीसकर यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला अभिषेक खणकर यांनी शब्धबद्ध केले आहे. हे गाणे २० जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाले असून केवळ एका दिवसात या गाण्याने ५ लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे तरुण मंडळी ‘बांबू’ चित्रपटातला सॉलिड प्रतिसाद देणार असे दिसत आहे. या गाण्यामध्ये अभिनय आणि वैष्णवीच्या मनातली उडणारी फुलपाखरं आपल्यालाही आपल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जातात. चोरून पाहणं, पाहून लाजणं, नजर भिडवून खुद्कन हासणं सगळं कसं मनोवेधक आहे. या गाण्यात आपल्याला तेजस्विनीची एक झलकसुद्धा पाहायला मिळत आहे, त्यामुळे अभिनय आता हे गाणे कोणासाठी म्हणतोय, हे ‘बांबू’ पाहिल्यावरच कळेल.

View this post on Instagram

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

या गाण्याबद्दल बोलताना गायक अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘मला खूप कमी रोमॅंटिक गाणी गायला मिळाली आहेत. हे गाणं गाण्यासाठी मी फार उत्सुक होतो. विशालसोबत या आधीसुद्धा काम केले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं श्रवणीय आहे. काही गाणी अशी आहेत जी मी रेकॉर्ड केल्यानांतर लूपमध्ये ऐकत असतो, त्यातलच हे सुद्धा एक गाणं आहे. गाण्याचं संगीत आणि बोल हे सुद्धा अफलातून आहेत’. तसेच या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले कि, ‘चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण आहे. तसंच या गाण्यातदेखील आहे. हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण होईल. त्यात अवधूतच्या आवाजाने या गाण्याला अजूनच चारचांद लावले आहेत.’ या चित्रपटात अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासह शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही प्रमुख भूमिकेत आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

Tags: Avadhoot GupteBambuInstagram PostUpcoming Marathi MovieYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group