Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नवा दिवस.. नवी भूमिका.. नवा चित्रपट..’; पुन्हा धिंगाणा घालायला आपला सिद्धू सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth Jadhav
0
SHARES
1.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार एनर्जीने संपूर्ण वातावरण बदलून टाकणारा अवली कलाकार सिद्धार्थ जाधव केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतही चमचमणारा तारा आहे. अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये त्याने बॉलिवूडचा उत्साही अभिनेता रणवीर सिंगबरोबर काम केले. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा काही बरा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आता सिद्धार्थ पुन्हा एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

एनर्जेटिक आणि दमदार अभिनयासाठी ओळखला प्रेक्षकांचा लाडका सिद्धू आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्यामुळे विविध लूक, व्हिडीओ आणि आपल्या आगामी चित्रपटाबद्दल तो सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना दिसतो. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘थ्री चिअर्स’ असे आहे. या चित्रपटातबद्दल माहिती देताना सिद्धार्थने मुव्ही क्लॅपसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘थ्री चिअर्स…. नवा दिवस, नवी भूमिका, नवा चित्रपट’.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘थ्री चिअर्स’ या आगामी चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह विजय पाटकर, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी असे अनेक कलाकार असणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्र पारितोष पेंटर यांच्या हाती देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता येत्या काळात हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थचे गेल्या वर्षाच्या शेवटी बॉलिवूड चित्रपट ‘सर्कस’ आणि मराठी चित्रपट ‘बालभारती प्रदर्शित झाले होते. यांपैकी बालभारती चित्रपटाला समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर सर्कसच्या पदरी अपयश आणि निराश आली होती.

Tags: New Upcoming MovieSiddharth JadhavViral PhotoViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group