हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचे भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न झालं. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने अथिया आणि राहुलने लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील १०० पाहुणे उपस्थित होते.
सोशल मीडियावर राहुल आणि अथियाच्या वेडिंग फोटोंची चांगलीच चर्चा आहे. दोघांचही सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंग आहे. ज्यामुळे त्यांच्या लग्नानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे वेडिंग फोटो व्हायरल केले आहेत आणि आता हे फोटोस नुसते व्हायरल होत नाहीयेत तर ट्रेंडिंगमध्येही आहेत.
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.
Discussion about this post