हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेते आणि बिग बॉस मराठी सीजन ४ फेम किरण माने यांची सोशल मीडियावर सध्या हवा आहे. बिग बॉससारख्या शोमध्ये टॉप ३ पर्यंत पोह्चल्यानंतर किरण माने बाहेर पडले आणि शो जिंकू शकले नाहीत. पण प्रेक्षकांची मन मात्र त्यांनी जिंकली. सर्वत्र किरण माने यांच्या चाहत्यांकडून वारंवार त्यांचे कोडकौतुक केले जात आहे. नुकतेच नेताजी सुभाषचंद्र भोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात किरण माने यांचे कौतुक झाले आणि ते भारावून गेले. या प्रसंगाचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
किरण माने यांनी हि पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘किरण मानेजी की विचारधारा हमसे अलग है… विरोधी है.. फिरभी एक अभिनेता के तौर पर हम उनके चाहनेवाले है ! बिगबाॅस मराठी हमने देखा है और दिल से एन्जाॅय किया है, तो केवल किरण मानेजी के एक्स्ट्रा ऑर्डिनरी फायटिंग स्पिरीट के लिए !!” अमराठी पण कर्मभूमी मुंबई असलेले अनेक सेलीब्रिटी आणि प्रेक्षक उपस्थित असलेल्या कार्यक्रमात माझं अशा शब्दांत कोडकौतुक होत होतं…मी भारावून जात होतो’.
पुढे लिहिले आहे कि, ‘…नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त ‘भारतीय सिनेयुग’ तर्फे पराक्रम दिवस साजरा केला गेला. त्यामध्ये विविध क्षेत्रातील ॲचिव्हर्सना ‘इंडीयाज प्राईड ॲवाॅर्ड’ प्रदान केले गेले. या कार्यक्रमात मलाही सन्मानित करण्यात आले. निवृत्त न्यायाधिश सी.एन्. थूल आणि निर्माता,लेखक विकास कपूर यांच्या हस्ते हा सन्मान मला दिला गेला. संस्थेचे संस्थापक अनिलकुमार शिंपी यांनी खूप सुंदर संयोजन केले. सर्वांचे मनापासून आभार’.
Discussion about this post