हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ३० जानेवारी असून भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७५वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन बापूजींना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय राहूल गांधी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक मराठी सेलिब्रिटींनीही महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ट्विटने मात्र वातावरण तापवलं आहे.
कभी कहते हैं यह हिंदुस्तान किसी के बाप का नहीं, कभी कहते हैं बापू का है। कभी कहते हैं हिंदुस्तान को मुग़ल ने बनाया। कभी कहते हैं अंग्रेजों ने बनाया। कभी कहते हैं नेहरू ने बनाया। कभी बापू ने बनाया। क्या कोई एक बाप नहीं है जिसे चुन सको।
विचित्र लोग। विचित्र बातें। https://t.co/S2u3AFIOBJ— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 30, 2023
त्याच झालं असं कि, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘बापूंनी संपूर्ण देशाला प्रेमाने, सर्व धर्म समानतेने जगायला आणि सत्यासाठी लढायला शिकवले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.’ राहुल गांधींच्या या ट्विटला रिट्विट करत आरजे सायमाने लिहिले की, ‘बापू, तुम्ही हा हिंदुस्थान बनवला. फक्त तुमचाच असेल. जय हिंद.’ या ट्विटवर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हि प्रतिक्रिया देताना अग्निहोत्रींनी लिहिले आहे कि, ‘कधी म्हणतात की हा हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही. कधी म्हणतात बापूंचा आहे. कधी कधी मुघलांनी भारत बनवला असे म्हटले जाते. कधी कधी इंग्रजांनी बनवले असे म्हणतात. कधी नेहरूंनी बनवलं असं म्हटलं जातं. तुम्ही निवडू शकता असा एकच पिता नाही का..? विचित्र लोक विचित्र गोष्टी.’ विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील बरेच जण त्यांच्या ट्विटवर नाराजी दर्शवताना दिसत आहेत.
Discussion about this post