Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्टाईलचा स्वॅग.. ॲटिट्यूडचा वाघ; जिगरबाज ‘टर्री’चा टर्रीfic ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tarri
0
SHARES
2.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय ललित प्रभाकर त्याचा आगामी चित्रपट ‘टर्री’साठी सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ललित प्रभाकरचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज आपल्याला पहायला मिळत आहे. ‘टर्री’च्या माध्यमातून ललित एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसतोय आणि त्यामुळे या चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने ‘टर्री’ या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते तर महेश सहानी आणि सुबूर खान हे सहनिर्माते आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ‘टर्री’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने तर सोशल मीडिया नुसता गाजवला आहे. अलीकडेच या चित्रपटातील ‘तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. जे चांगलेच चर्चेत आहे. यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

‘टर्री’ नावाने टोटल राडा असला तरी यात लव्हस्टोरी आहे आणि या लव्हस्टोरीची हिरोईन अर्थात टर्रीची प्रेयसी हि अभिनेत्री गौरी नलावडे आहे. या आधी गौरी नलावडे हि प्रचंड गाजलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटात दिसली होती. त्यावेळी तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. याआधी तिने ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेतून आपली प्रतिमा प्रेक्षकांवर पाडली होती. ट्रेलर पहिला कि समजेल हा चित्रपट अगदी नावाप्रमाणे आहे. ज्याला आजतागायत चॉकलेट बॉय आणि रोमँटिक हिरो म्हणून पाहिलं तो ललित आता टर्री’च्या माध्यमातून पूर्णपणे ऍक्शन भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात पहायला मिळणार आहे.

Tags: Gauri NalawadeInstagram PostLalit PrabhakarOfficial TrailerUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group