हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. भारताच्या राष्ट्रीय विक्रमकारक अशी ओळख असणाऱ्या ललिता शिवाजी बाबर यांची भूमिका साकारायला मिळणार म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकर स्वतः फार उत्सुक आहे.
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि इंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषी नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या राष्ट्रीय विक्रमकारक अशी ओळख असणाऱ्या ललिता शिवाजी बाबर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून हा एक बायोपिक आहे. या चित्रपटाबाबत बोलताना टिझर लॉन्च कार्यक्रमात ललिता शिवाजी बाबर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या कि, ‘कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते.’
तसेच ‘ललिता शिवाजी बाबर’ यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली कि, ‘आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ यांची छोटीशी झलक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवायला मिळाली. याचा आनंद आहे. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, मागील एक दीड वर्षांपासून मी जे काही करत होते, हे सगळं आज मार्गी लागले. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या. ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा खास क्षण आहे. आता कुठे प्रवास सुरु झाला आहे. अजून खूप पळायचे आहे.’
Discussion about this post