हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वाची ड्रामाक्वीन राखी सावंत सध्या अतिशय विचित्र परिस्थितीतून जात आहे. नुकतेच तिच्या आईचे निधन झाले आणि तिचे मातृछत्र हरपले. शनिवारी २८ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचे निधन झाले. बऱ्याच महिन्यांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराने त्रस्त होत्या. दरम्यान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच हि झुंज थांबली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आधीच आईच्या निधनाचा धक्का त्यात आता वैवाहिक आयुष्यातील कठीण प्रसंगांमुळे राखी पूर्ण कोलमडली आहे.
नुकतीच राखी जिममधून बाहेर येताना स्पॉट झाली. यावेळी राखी ढसाढसा रडताना दिसली. तिने आपल्या लग्नाबाबतही यावेळी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना आणि रडताना राखी म्हणाली कि, ‘माझे लग्न धोक्यात आले आहे. मला माझे लग्न वाचवायचे आहे. लग्न म्हणजे जोक नाही. माझ्या आयुष्यात येऊन कोणाला काय मिळतं..? कोणाला काय मिळतंय कोण येतंय माझ्या वैवाहिक आयुष्यात…? माझ्यावर अत्याचार करू नका. मला खुप जास्त त्रास होतोय’. या संपूर्ण व्हिडिओमध्ये राखी रडताना आणि किंचाळताना दिसली.
राखीची अशी अवस्था पाहून तिचे चाहते भावुक झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र राखीचाच क्लास घेतला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला चांगलंच सुनावताना ‘हा ड्रामा आता बंद कर’ असे म्हटले आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्यापासून ती रोज रडारड करताना दिसली आहे. एकीकडे तिने प्रेमासाठी लग्न बदलला. नाव बदललं आणि आता तिचा आदिल तिच्या कठीण प्रसंगात तिच्यासोबत नाही हेच दिसत आहे.
Discussion about this post