हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात लवकरच सुमित लोंढेसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या वनिताच्या लग्नाआधीचे विधी सुरु झाले आहेत. मेहंदी, हळद आणि नुसती धम्माल धम्माल सुरु आहे. वनिताच्या हातावर सुमितच्या नावाची मेहंदी रंगली आणि आज उष्टी हळद लागली. या कार्यक्रमासाठी हास्यजत्रेचे हास्यवीर उपस्थित होते. यावेळी हळदीचा रंग आणखी उजळला. अभिनेत्री नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, स्नेहल शिदम यांनी सुमित- वनीच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
वनिताच्या हळदीच्या कार्यक्रमात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी हजर होते. नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी, ओंकार राऊत, ईशा डे अशा अनेक कलाकारांनी वनिता आणि सुमितच्या हळदीत धमाल केली. सगळ्यांनी हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर वनिता आणि सुमितनेही पिवळ्या रंगाचे लक्षवेधी कपडे परिधान केले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हळदीचा आणि एकमेकांच्या प्रेमाचा रंग चांगलाच खुलला होता.
अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे गेली अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण आता खऱ्या अर्थाने ते कायमचे एकत्र येणार आहेत. त्यांच्या नात्याची उघड कबुली दिल्यानंतर हि जोडी चांगलीच चर्चेत राहिली आहे.
वनिता आणि सुमितच्या परी वेडिंग फोटोंचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा राहिली. यानंतर आता त्यांच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वनिता खरातचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि प्रसिद्ध ब्लॉगर आहे.
Discussion about this post