हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा संजुबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त याने गेल्या काही काळापासून टॉलिवूड सिने इंडस्ट्रीही गाजवण्यास सुरुवात केली आहे. केजीएफ मधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचे असे काही लक्ष वेधले कि बॉलिवूड काय आता तर टॉलिवूडलाही संजू बाबा भावला आहे. यानंतर आता लवकरच तो एका तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चिगत्रपटाचे नाव आहे ‘थलापथी 67’. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक अलीकडेच रिलीज झाला असून चांगलाच चर्चेत आला आहे.
प्रॉडक्शन हाऊस 7 स्क्रीन स्टुडिओने थलापथी विजयसह आपला आगामी चित्रपट ‘थलापथी 67’ची घोषणा केली असून या सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमातील काही मुख्य कलाकारांची नावे जाहीर केली आहेत आणि प्रेक्षकांमधील सिनेमाबाबतची उत्सुकता वाढीस लावली आहे. माहितीनुसार, या सिनेमामध्ये संजय दत्त, अर्जुन, गौतम मेनन, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान आणि त्रिशा कृष्णन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून विजय आणि त्रिशा तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
‘थलापथी 67’ हा सिनेमा एक अॅक्शन थ्रिलर ड्रामा आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून निर्मात्यांनी सोशल मीडियावर यातील काही कलाकारांच्या भूमिकेचे फर्स्ट लूक रिलीज केले आहेत. युनोमध्ये संजय दत्तचाही समावेश आहे. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘संजू सर हे फायनली तमिळ चित्रपटामध्ये येत आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. आम्हाला ‘थलापथी 67’ची घोषणा करताना आनंद होतो आहे’.
या सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. 7 स्क्रीन स्टुडिओच्या ‘थलापथी 67’या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली आहे. तर दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन हे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे.
Discussion about this post