हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर राखी सावंत तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत येताना दिसत आहे. पहिल्यापासूनच राखी तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे वारंवार प्रकाश झोतात राहिली आहे. यानंतर आणि आदिलच्या लग्नाची माहिती समोर आली तेव्हापासून नुसता आणि नुसता ड्रामा सुरु आहे. अलीकडेच तिची आई जया सावंत यांचे ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारामूळे ग्रस्त होती. आता तिच्या लग्नामुळे तिला ट्रोल केलं जातयं. तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता त्यातच आदिलने तिच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
राखीने तिचा पती आदिल याच्यावर आरोप करताना म्हटले आहे कि, ‘त्याने केवळ प्रसिद्धीसाठी माझा वापर केला आहे. त्याला इंडस्ट्रीत यायचं होतं आणि त्यासाठी त्याने मला शिडी बनवलं. तो नेहमीच खोटं बोलतो. इतकच काय तर त्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरु आहे आणि असे अफेअर करण्यासाठीच त्याने मला लग्न लपवायला सांगितलं होत. आता तो माझी आणि त्या मुलीचीसुद्धा फसवणुक करत आहे. ज्यामुळे ती दुसरी मुलगी त्याला ब्लॅकमेल करू लागली आहे आणि म्हणतेय कि राखीला तलाक दे’, पण मी त्याला सोडणार नाही. वेळ आली तर सगळं सत्य बाहेर काढेन. मला कुणाची शिडी व्हायचं नाही मला फक्त माझा संसार करायचा आहे बस्स.
यावर आता अदिलने राखीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी आदिलने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे कि, ‘राखीने घरातील भांडणं घरातच ठेवली पाहिजेत’. यापुढे आदिलने काहीही न बोलणे योग्य समजले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र या प्रत्युत्तरानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकरी देखील राखीला हाच सल्ला देत आहेत कि, ‘तिने घरातला वाद चव्हाट्यावर आणू नये’. शिवाय ‘नवऱ्यासोबतच भांडण घरातच मिटवावं आणि आम्हाला त्रास देणं बंद करावं’ असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
Discussion about this post