Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मला या दोघींनी “वेड” लावलंय..; सिद्धार्थ जाधवच्या लेकींचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
171
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट तुफान हिट झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटून गेला असला तरीही त्याची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील गाणी विशेष गाजली आहेत. ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर सोशल मीडियावर नवा ट्रेंड आणला. या गाण्यात रितेश देशमुखसोबत बॉलिवूडचा भाईजान थिरकला आहे. यानंतर आता सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या लेकींनीही यावर व्हिडीओ बनवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या दोन्ही लेकींनी कारमध्ये बसून या गाण्याच्या हूकस्टेप केल्या आहेत आणि हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यावर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘या दोघींनी मला वेड लावलंय’. हि पोस्ट त्याने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांना टॅग केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर अगदी रितेश देशमुखनेही प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलच्या स्टोरीवर सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या मुलींचा हा भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओसोबत रितेशने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले होते कि, ‘तुम्हाला खूप सारं प्रेम’. हा व्हिडीओ गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकंदरच काय सिद्धार्थसारखीच त्याच्या लेकींचीही हवा एकदम जोरदार आहे.

Tags: Instagram PostRiteish deshmukhSiddharth JadhavViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group