Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वडिलांच्या 25 वर्ष जुन्या दुकानावर लेकीच्या मालिकेचं पोस्टर; चाहत्यांनीही केले कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 12, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Titeeksha Tawade
0
SHARES
164
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मुलांचं यश पाहून त्याचं कौतुक करण्यासाठी आई वडील शक्य ते सगळं करतात. छोट्यातल्या छोटया गोष्टीतही ते आपल्या मुलांचं समाधान शोधतात. त्यांनी सुखात आणि आनंदात राहावं यासाठी आई वडिलांचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. अशीच एक गोष्ट टीव्ही विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बाबतीत झाली आहे. झी मराठीवर सुरु असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या कौतुकाची आई वडिलांनी लढवलेली शक्कल फक्त तितिक्षाच्या नव्हे तर प्रेक्षक आणि चाहत्यांच्याही मनाला भावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

‘तिसऱ्या मुलीची तिसरी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे ही नेत्रा नामक मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेचा टीआरपीदेखील उत्तम आहे. असे असताना आपल्या लेकीचे कौतुक करण्यासाठी तितिक्षाच्या वडिलांनी या मालिकेचं पोस्टर आपल्या दुकानाच्या दरवाज्यावर लावलं आहे. जे पाहून फक्त तितिक्षा नव्हे तर तिचे चाहतेही भावुक झाले आहेत. याबाबत माहिती देणारी पोस्ट अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली होती. हि पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. यावर तितिक्षाच्या अनेक चाहत्यांनी तिचे आणि तिच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे. हि पोस्ट अजूनही व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

अभिनेत्री तितिक्षा तावडेच्या वडिलांचं डोंबिवलीमध्ये नॉवेल्टीचं दुकान आहे. गेली २५ वर्ष ते हे दुकान चालवत असून तितिक्षा फार कमी वेळा आपल्या वडिलांच्या दुकानात गेली आहे. मात्र यावेळेस जेव्हा ती दुकानात गेली तेव्हा तिने जे पाहिलं ते अगदी डोळ्यात पाणी आणणारं होतं. एक व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये याची माहिती देताना लिहिलं होतं कि, ‘हे आमचं २५ वर्ष जुनं दुकान आहे. आम्ही क्वचितच दुकानात जातो. पण जेव्हाही जातो तेव्हा आमच्या नव्या मालिकेचं पोस्टर दुकानाच्या दरवाज्यावर आम्हाला दिसतं. मला माहीत नाही पप्पा हे पोस्टर कुठून मिळवतात. पण हो ही आमच्या आई- वडीलांची पद्धत आहे त्यांचं प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्याची. आपल्या पालकांना आपलं यश साजरं करताना पाहणं ही आयुष्यातील सगळ्यात खास गोष्ट आहे.’

Tags: Instagram PostSatvya Mulichi Satvi MulgiTitiksha Tawdetv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group