हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सीजन १६ चा ग्रँड फिनाले काल रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडला. भव्य दिव्य आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला. प्रेक्षकांच्या अंदाजानुसार प्रियांका चहर चौधरी बिग बॉस सीजन १६ चे विजेतेपद मिळवेल अशी चर्चा होती. मात्र शिव ठाकरेलाही मागे टाकून एमसी स्टॅनने बाजी मारत हे विजेतेपद मिळवले. त्यामुळे सगळे अंदाज फोल ठरले आणि ट्रॉफी पुणेकर एमसी स्टॅनने जिंकली.
एका झोपडपट्टीतून रॅपर म्हणून प्रकाश झोतात आलेला एमसी स्टॅन बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल असा कुणीच अंदाज लावला नसेल. पण एम सी स्टॅनचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
तर शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला आणि प्रियंका चहर चौधरी सेकेंड रनरअप ठरली. बिग बॉसच्या सिजनमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांचा अंदाज गंडला. अनेकांना प्रियंका चहर चौधरी जिंकेल असं वाटत होत तर दुसरीकडे शिव ठाकरेला घेऊन मोठमोठे अंदाज लावले गेले होते. पण सगळी गणित, समीकरणं चुकली आणि एमसी स्टॅन ठरला विजेता.
एमसी स्टॅनच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगने त्याला विजेतेपद मिळवून दिले. पूर्ण खेळात एमसी स्टॅन सगळ्यांपेक्षा खूप वेगळा राहिला. कधी शांत तर कधी भडकून खेळला. पण पक्का दोस्त बनून राहिला. म्हणूनच एमसी स्टॅन प्रेक्षकांनाही भावला. बिग बॉस १६ चे विजेतेपद मिळवून त्याने तब्बल ३1 लाख ८० हजाराची रोख रक्कम जिंकली आणि सोबतच एक आलिशान गाडीची चावीदेखील सलमानने त्याच्या स्वाधीन केली. गरीब कुटुंबातून आलेला एमसी स्टॅन आता एका वेगळ्या ओळखीने जगासमोर आला आहे. या यशानंतर त्याच भविष्य आणखी प्रकाशमय असेल यात काही वादच नाही.
Discussion about this post