हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने विविध मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने सुत्रसंचालक म्हणून एक वेगळी छाप पाडली आहे. आता तर अभिनेत्रीच नव्हे तर ती एक व्यावसायिकाही आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमठवणाऱ्या प्राजक्ताने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती अशी कि,. प्राजक्ताला सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ’चा ‘युवा पुरस्कार’ सन्मान देण्यात आला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक चाहते तिचं कौतुक करत अभिनंदन करत आहेत. तसेच तिने यावेळी साडी परिधान केल्यामुळे ती इतकी सुंदर दिसत होती कि तिच्या सौंदर्याचीही विशेष तारीफ केली जात आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ता माळी म्हणाली कि, ‘परवा सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचा ”युवा पुरस्कार” मिळाला… पुणे शहरात वाढले, सगळं शिक्षण पुण्यात झालं, पुणे विद्यापीठातून पदवीधर झाले… त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे…’
‘ह्यात “ललित कला केंद्र- गुरुकुल – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”, माझे नृत्य गुरूद्वय- गुरू श्रीमती स्वातीताई दातार, गुरू श्री. परिमल फडके, माझं कुटूंब, माझी प्राथमिक शाळा – समर्थ विद्यालय, माध्यमिक शाळा – दामले प्रशाला-महाराष्ट्र मंडळ, पुणे शहर, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, आतापर्यंत केलेल्या सगळ्या मालिका, चित्रपट, विशेषकरून महाराष्ट्राची हास्यजत्रा, Art of living foundation- श्री श्री रवीशंकरजी आणि “माझा अत्यंत प्रामाणिक असा प्रेक्षकवर्ग” ह्या सगळ्यांचा सहभाग आहे… विद्यापीठाचे, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे सर व परिमल सर ह्यांचे विशेष आभार…. सरतेशेवटी.., माझ्याकडून तुमचं जास्तीक जास्त मनोरंजन होवो, तुमची सेवा घडो; हीच ईश्वराचरणी प्रार्थना’.
Discussion about this post