हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी बिग बॉसच्या १६’व्या सीजनचा ग्रँड फिनाले मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे टॉप ३ स्पर्धक राहिले. यामधून प्रियांका आणि शिव यांना मागे टाकून एमसी स्टॅनने बाजी मारली. अशाप्रकारे यंदाच्या बिग बॉसच्या सिजनची ट्रॉफी पूर्ण सिजनमध्ये चर्चेत राहिलेल्या मंडलीच्या नावेच झाली. या मंडलीचा भाग असणाऱ्या साजिद खानची बहीण आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खानने हा सीजन संपल्यानंतर तिच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी सिजनमधील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
फराह खानने तिच्या घरी आयोजित केलेल्या या खास पार्टीत तिचा भाऊ आणि बिग बॉसचा स्पर्धक साजिद खान याशिवाय बिग बॉसमधले सर्व स्पर्धक सहभागी होते. या पार्टीत सिजनप्रमाणेच मंडलीची एकदम जोरदार चर्चा सुरु होती. पार्टीत सहभागी होताना या सर्व स्पर्धकांनी टोट्टल मॉडर्न लूक केला होता. सगळे आनंदात एकमेकांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसले. या पार्टीची एक झलक शेअर करताना फराह खानने काही व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत.
या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये फराह खानने लिहिले आहे कि, ‘कधीकधी फक्त चांगले क्षण हे साजरे करायचे असतात…’. या पार्टीत सगळे एकत्र एन्जॉय करत तो क्षण जगताना दिसले. यावेळी शिव ठाकरे आणि निम्रीत कौर या दोघांनी एकमेकांसोबत एक खास फोटोशूटसुद्धा केलं. इथे निम्रीतने ग्रीन रंगाचा वन पीस परिधान केला होता. तर शिवने गुलाबी रंगाचा सूट आणि आत पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला. तसेच स्टॅन, साजिद, अब्दू, शिव आणि निम्रीत या मंडलीने धम्माल केली. शिव ठाकरे जिंकू शकला नसला तरीही आपला मित्र जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला आहे.
Discussion about this post