हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ या चित्रपटातून दगडू म्हणून प्रकाश झोतात आलेला अभिनेता प्रथमेश परब नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. कधी खाजगी आयुष्यामुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. पण यावेळी प्रेक्षकांचा लाडका दगडू त्याच्या खऱ्या आयूष्यातील प्राजूमुळे चर्चेत आला आहे. आज १४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डे’ दिनानिमित्त त्याने आपल्या खऱ्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या नात्याची अधिकृत कबुली दिली आहे. तशी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगली चर्चेत आली आहे.
गेल्या वर्षातील दिवाळीत प्रथमेश परबने त्याच्या एका मैत्रिणीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. ते पाहून सोशल मीडियावर त्याला त्याच प्रेम मिळाल्याची चर्चा रंगली होती. पण आतापर्यंत काही प्रथमेशने याबाबत अधिकृत विधान केले नव्हते. यानंतर अखेर आज व्हेलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रथमेशने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेशने त्याची मैत्रीण क्षितिजा घोसाळकरसोबत असलेल्या आपल्या प्रेमाच्या नात्याची अखेर आज अधिकृत घोषणा केली आहे. त्याने गर्लफ्रेंड क्षितिजासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ती म्हणते हे करू…. मी म्हणतो ओके… आणि हे असंच सुरू राहू दे’. तसेच हर कपल कि कहानी.. फॉरेव्हर टू गो असे हॅशटॅग प्रथमेशने दिले आहेत. सोबत मला वेड लागले प्रेमाचे.. हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. तसेच क्षितिजानेही प्रथमेशसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे दोन वर्षांतील काही फोटो तिने शेअर केले आहेत. यावरून समजते कि गेल्या २ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. या व्हिडिओसोबत तिने तू नझ्म.. नझ्म सा मेरे.. हे गाणे बॅकग्राऊंडला वापरले आहे. तसेच व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रथमेशने क्षितिजाला प्रपोज केलं होतं आणि आता हि जोडी अधिकृतपणे समोर आली आहे. त्यामुळे चाहतेही यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Discussion about this post