हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी यांची घट्ट मैत्री आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर बिग बॉस संपला पण अमृता आणि तेजस्विनी दोघीही सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिल्या. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृता सर्वाधिक चर्चेत राहणारी स्पर्धक ठरली.
तर तेजस्विनीचं खरी विजेतेपदाची उमेदवार असे प्रेक्षकांनी घोषित केले. अनेक टास्कमध्ये या एकमेकींना भिडल्याचे दिसले. पण शेवटी मैत्री तर होतीच. यानंतर आता या दोघी पुन्हा एकत्र दिसल्या आहेत. अमृताने एक व्हिडीओ इंस्टावर शेअर केला आहे. जो व्हायरल होतोय.
टास्कदरम्यान झालेल्या झालेल्या भांडणानंतर या दोघी एकमेकींशी बोलल्यादेखील नव्हत्या. अर्थात बिग बॉस मराठीच्या फिनालेआधी जेव्हा तेजस्वीनी BB घरात आली होती तेव्हा ती अमृताला भेटली होतीच. मात्र त्यांची मैत्री कशी आहे याचा खुलासा झाला नव्हता. शिवाय शोनंतर त्या कधी एकमेकींना भेटल्याचेही दिसले नाही. म्हणजे यांची मैत्री तुटली कि काय..? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. पण आता अमृताने या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. तिने शेअर केलेला व्हिडीओ या चर्चांचे उत्तर आहे.
अभिनेत्री अमृता धोंगडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तेजस्वीनी लोणारीबरोबर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने सांगितले आहे कि, बिग बॉसच्या घरातील भांडणाचा आमच्या मैत्रीवर काही परिणाम झालेला नाही आणि आम्ही एकमेकींना नेहमीच भेटतो. फक्त सोशल मीडियावर एकत्र येण्याची आमची ही पहिलीच वेळ आहे. लवकरच आम्ही एका प्रोजेक्टमध्येही एकत्र दिसणार आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘अखेर तेजस्वी आणि अमृताचा मिलाप झाला आहे लवकरच येतोय भेटायला’.
Discussion about this post