Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लायकी विसरलात काय..? बॉलिवूड सेलिब्रिटींनी ठेवला भारताच्या नकाशावर पाय; अक्षय कुमारसह ‘या’ अभिनेत्री ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 15, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
66
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा गेल्या काही महिन्यांपासून सलग फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे चर्चेत राहिला आहे. इतकेच नव्हे तर अक्षयचा लेक आणि पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नादेखील सतत चर्चेत असल्यामुळे खिलाडीबद्दलही वारंवार बोलले जाते. असाहतच आता तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पण यावेळी केवळ चर्चा नव्हे तर सोबत ट्रोलिंगदेखील सुरु आहे. भारताच्या नकाशावर चालल्याप्रकरणी त्याच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ट्रोलिंगच्या रूपात आपला संताप व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे यामध्ये केवळ अक्षय कुमार नव्हे तर बॉलिवूडचे अन्य काही सेलिब्रिटी देखील सामील आहेत. ज्यामुळे त्यांनाही या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेता अक्षय कुमार हा स्वतः भारतीय असून त्याने अशी चूक नव्हे तर गुन्हा केला आहे आणि यामुळे समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आधीच गेल्या वारसाने अक्षय कुमारला फारसं यश काही दिल नाही. त्यात आता या वादामुळे अक्षय कुमारची २०२३ देखील काही बरं जाण्याची शक्यता कमीच आहे. सम्राट पृथ्वीराज, रामसेतू, बच्चन पांडे या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धूळ चाखल्यानंतर आता हेरा फेरीच्या सिक्वलमुले अक्षय कुमारला थोड्या आशा आहेत. असे असताना हा वाद उफाळला आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे प्रमोशन करतो. याहीवेळी तो हेच करताना त्याच्या हातून किंवा या प्रकरणात त्याच्या पायांकडून हि चूक झाली असे म्हणावे लागेल.

यावेळी तो चक्क भारताच्या नकाशावर चालत असल्याचे पोस्टर त्याने शेअर केले आहे आणि हे पाहून तमाम भारतीयांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत अक्षय कुमार, नोरा फतेही, मौनी रॉय आणि दिशा पटनी असे काही बॉलिवूड कलाकार दिसत आहेत. देशाच्या नकाशावर चालणं या कलाकारांना भारीच महागात पडताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार जितका ट्रोल होतोय तितका आधी कधीच झाला नसेल. शिवाय एका वकिलाने त्याच्याविरोधात थेट गृहमंत्रालयात तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ एका इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या प्रचाराचा आहे. वकील विरेंद्र पंजाबी यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित जिल्ह्याचे एसपी आणि गृहमंत्रालय यांच्याकडे तक्रार केली आहे. आता या प्रकरणाचं पुढे काय होणार हे अपडेटनुसार कळेल.

Tags: akshay kumarDisha PatniInstagram PostMouni RoyNora fatehiSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group