हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत सुंदर मोहक अभिनेत्री जिला अप्सरा म्हणून संबोधले जाते ती म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आणि चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. नुकतेच तिचे आपल्या अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर नवे फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये ती एखाद्या नववधुसारखी भासते आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकरी आणि चाहते सुद्धा क्षणभर भान हरपले असतील यात शंकाच नाही.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हे नवे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने गुलाबी रंगाची वधूमय साडी नेसली आहे. शिवाय साडीला साजेसा शृंगार करीत, विविध आभूषणे आणि हेअर स्टाईल केली आहे. या फोटोंसाठी सोनालीने दिलेली प्रत्येक पोझ काळजावर वार करतेय. त्यामुळे साहजिकच हे फोटो पाहून कुणाचाही जीव कासावीस होईल. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नवरी नटली… लग्न म्हटलं की आठवणींचा खजिना आणि ह्या आठवणी सुंदर बनवण्यासाठी सोनाली पैठणी घेऊन येत आहे नवीन “लग्न कलेक्शन” !
अर्थात सोनालीने परिधान केलेली ही सुंदर साडी सोनाली पैठणी यांच्या ‘ लग्न कलेक्शन ‘ मधली आहे. ज्यामध्ये सोनाली स्वतः नव्या नवरीसारखी दिसतेय. सोनालीच्या या फोटोंवर अनेक नेटकरी तसेच चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. प्रत्येकाने तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. इतकेच काय तर अनेक फिमेल फॅन्स तिच्या साडीच्या मोहकतेवर भाळल्या आहेत. एका नेटकऱ्याने तिच्या या फोटोवर कमेंट करत म्हंटले आहे की, ‘ हे फोटो पाहून सिद्ध होत की तूच अप्सरा आहेस ‘. तर आणखी एकाने म्हंटले आहे की, ‘ मला बरंच काही बोलू वाटतं असल तरी मी विवाहित आहे आणि म्हणून एव्हढंच बोलू शकतो की… सुंदर ‘
Discussion about this post