हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीने सातासमुद्रापार आपला डंका वाजवण्यास सुरुवात केली असून मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, हि अत्यंत अभिमानाची बाब आहे. सध्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरु झाला असून यामध्ये जितेंद्र जोशीचा ‘घाट’ हा मराठी चित्रपट सहभागी झाला आहे. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असून या निमित्ताने जितूची झेप बर्लिन फिल्म फेस्टिवलपर्यंत पोहोचली आहे. या फेस्टिवलमध्ये जितेंद्र कडक सुटाबुटात एकदम साहेब बनून गेला होता आणि त्याचा अंदाज कमाल आहे. या फेस्टिव्हलचा अनुभव शेअर करताना त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी याने त्याचा बर्लिन फिल्म फेस्टिवलमधला अनुभव आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेयर केला आहे. हि पोस्ट शेअर करताना जितेंद्रने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या आयुष्यातील आणखी एक अविस्मरणीय रात्र!!! जगभरातील सुरेख कपडे घातलेले स्त्री-पुरुष आणि सिनेमाबद्दल प्रेम आणि उत्कट मन. पीटर डिंकलेज आणि ऍना हाथवे यांचा SHE CAME TO ME हा शानदार ओपनिंग सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. हा एक अतिशय उत्तम लेखन आणि सादर केलेला सिनेमा होता. आणि अर्थातच पार्टीनंतर बर्लिनच्या रस्त्यावर पावसाच्या काही लहान थेंबांसह फिरायला मिळाले’.
‘आय लव्ह यू सिनेमा.. माझ्यासारख्या अनेक सामान्य लोकांना तुम्ही प्रवास करायला लावले आणि अनेक असामान्य लोक आणि ठिकाणांजवळ बसवले. घाट साठी माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद.. छत्रपाल निनावे आणि शिलादित्य बोरा तुमचे अभिनंदन. तुम्ही एक योग्य सिनेमा विकत घेतला ज्याचा प्रीमियर २२ फेब्रुवारी रोजी बर्लिन येथे होईल. इतर सिने रसिकांसह आमचा सिनेमा सुद्धा साजरा करूया’. अभिनेता जितेंद्र जोशीचा याआधीचा ‘गोदावरी’ हा चित्रपटदेखील प्रचंड गाजला आणि आता ‘घाट’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.
Discussion about this post