हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील काही कलाकार असे आहेत जे केवळ मनोरंजन करून नव्हे तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात चांगली कर्म करण्यासाठी लोकप्रिय आहेत. यांमध्ये सगळ्यात पहिले अभिनेता सोनू सुदचे नाव समोर येते. कोरोनाच्या महाभयंकर काळात सोनू सूदने त्याच्या परीने गरजू लोकांना शक्य तितकी मदत केली. कोरोनानंतरही त्याच समाजकार्य सुरु राहील आणि म्हणून त्याला मसीहा हे नाव पडलं. याचा परिणाम असा झाला कि काही ठिकाणी त्याची पूजा केली जाऊ लागली, मंदिरे बांधली आणि आता भारतातील सगळ्यात मोठ्या थाळीला त्याच नाव देण्यात आलं आहे.
अभिनेता सोनू सूद हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ तसेच प्रवासवर्णन, अनुभव शेअर करत असतो. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांसोबत भारतातील सगळ्यात मोठी थाळी जी त्याच्या नावाने विक्री होते त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने कॅप्शन शेअर करताना म्हटले आहे कि. ‘भारतातील सर्वात मोठ्या थाळीला माझं नाव देण्यात आलं आहे. मी एक शाकाहारी माणूस असून माझ्यासारख्या कमी आहार असलेल्या माणसाचं नाव २० व्यक्ती खाऊ शकतील अशा थाळीला दिले जाऊ शकते, असा मी विचारच केला नव्हता’.
तर हैद्राबाद येथील गिस्मत या अरेबिक हॉटेलमध्ये साधारण २० लोकांसाठी एक खास मटण थाळी दिली जात आहे. याच थाळीला अभिनेता सोनू सूद याचं नाव देण्यात आलं आहे. सोनू सूदने शेअर केलेली हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत या थालीबाबत मोठे कुतूहल व्यक्त केले आहे.
Discussion about this post