हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भालचंद्र कदम म्हणजेच आपला लाडका कॉमेडीचा बादशहा भाऊ आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणचा कोहिनुर ओंकार भोजने प्रकाशझोतात आला. हे दोन्ही चेहरे प्रेक्षकांचे लाडके कधी झाले ते कळलंच नाही. विविध माध्यमातून विनोदाचे हास्य फंवारे सोडत या दोघांनीही आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. यामुळे त्यांना कॉमेडीच्या दुनियेत एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. आपापल्या कामात दोघेही तरबेज आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा.. लोटपोट हसवल्याशिवाय ते मागे हटतच नाहीत. अशातच आता ‘करून गेलो गाव’ हे मालवणी नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे. त्यामुळे हि जोडी आपल्याला खदखदून हसवायला सज्ज आहे.
थेट महेश मांजरेकरांच्या गोटातून आणि नाट्य निर्माते राहुल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘करुन गेलो गाव’ हे मालवणी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहे. यामध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम एकमेकांच्या साथीने, मालवणी भाषेच्या गोडीने आणि विनोदाच्या भन्नाट टायमिंगने सुसाट बॅंटिग करणार आहेत. थोडक्यात काय तर टोट्टल मनोरंजन मिळणार हे नक्की.
अद्वैत थिएटर्स आणि अश्वमी थिएटर्स निर्मित महेश वामन मांजरेकर ‘करून गेलो गाव’ हे नाटक व्यावसायिक स्वरूपात सादर करत आहेत. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे आहेत. तर निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर आहेत.
‘करुन गेलो गाव’ या नाटकाविषयी अगदी थोडक्यात काही सांगायचे असेल तरर, हे एक मालवणी भाषेतलं नाटक आहे. मालवणी भाषेची थेट भिडणारी बोली काळजाला हात घालते हे काही वेगळे सांगायची गरज नाही. या नाटकातील बारकावे वेधण्यासाठी एकांकिका आणि सतेज गाजवलेला ओंकार भोजने एकदम परफेक्ट आहे. तसेच भाऊ कदमची साथ असल्याने प्रत्येक प्रयोग भाव खाऊन जाणार आणि हाऊसफुल्ल बोर्ड लागणार यात काही शंकाच नाही. आता प्रतीक्षा आहे ते तिसऱ्या घंटेची…
Discussion about this post