हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी रात्री मुंबईतील चेंबूर भागात सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेल्या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. कार्यक्रम आटपून गायक निघाला असता स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने सेल्फीची मागणी केली. सोनू निगमने सेल्फीसाठी नकार दिल्यामुळे येथे धक्काबुक्कीचा प्रकार घडला आणि यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं. या प्रकारावर संगीत विश्वातील अन्य लोकप्रिय गायक मिका सिंग याने प्रतिक्रिया दिली आहे.
गायक मिका सिंगने सोनू निगमबरोबर घडलेल्या प्रकारावर पोस्ट शेअर करताना सोनूसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहले आहे कि, ‘आदरणीय गायक सोनू निगम यांच्यावर मुंबईत हल्ला झाला हे ऐकून खूप वाईट व धक्कादायक आहे. जेव्हा उत्तर भारतात शो करतो तेव्हा माझ्याबरोबर १० अंगरक्षक आहेत पण मुंबईत माझ्याबरोबर अंगरक्षक नसतात कारण हे शहर भारतातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित शहर आहे. सर्वच कलाकारांना मान द्यायला हवा असे माझे मत आहे. लोकांनी आम्हाला बनवले आहे आम्ही लोकांसाठी आहोत. सोनू निगम आम्ही तुमच्याबरोबर आहोत’.
सोमवारी या कार्यक्रमात धक्काबुक्की झाली या दरम्यान सोनू निगमच्या सहाय्यासाठी त्याचे काही सहकारी मध्ये पडले. यावेळी त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आणि यावेळी सोनू निगमच्या एक सहकारी मंचावरून खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली. गायकाच्या तक्रारीची दखल घेऊन चेंबूर पोलिसांनी आमदार पुत्र स्वप्नील फातर्पेकर याला चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे.
Discussion about this post