हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखीला दुसऱ्या लग्नातही दगा मिळाल्याचे समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. शेवटी राखीने तिचा पती आदिलविरोधात आवाज उठवला आणि तक्रार नोंद केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान आदिल खानवर म्हैसूरमध्येही एका इराणी महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर आदिलची म्हैसूर पोलिसांकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.
या सगळ्यात आता आदिल खान प्रकरणावर राखीचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिने सांगितले कि, ‘अंधेरी कोर्टातून न्याय मिळाला नाही तर उच्च व सत्र न्यायालयात जाऊ’. याशिवाय राखीने म्हैसूर प्रकरणाबाबतही भाष्य केले आहे. याबाबत बोलताना राखी सावंतने म्हटले कि, ‘आदिलवर आरोप केलेल्या इराणी महिलेने मला ऑडिओ पाठवले आहेत. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. आय लव्ह यू असं म्हणून आदिलने त्या इराणी महिलेलाही लग्नाचं वचन दिलं होतं’.
पुढे म्हणाली, ‘लग्नानंतर आदिलच्या चुका मी दहा वेळा माफ केल्या आहेत. पण त्याने लग्नाआधीच मला मारण्याचा प्लॅन केला होता. आदिल मी तुला कोणत्या उद्देशाने माफ करु..? तुरुंगात राहिल्यामुळे आदिलच्या वागणुकीत बदल येईल, तो सुधारेल, अशी मला अपेक्षा आहे’. असेही राखी म्हणाली आहे. याशिवाय राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये फसवणूक, मारहाण, मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोपदेखील राखीने आदिलवर केला आहे. तसेच तुरुंगात भेटायला गेली असताना आदिलने राखीला धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे.
Discussion about this post