हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीच्या अतिशय गाजलेल्या दोन मालिका.. एक म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ आणि दुसरी ‘अग्गं बाई सासूबाई’ यामधून अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचलेली. तेजश्रीच्या अभिनयावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. केवळ मालिकाच नव्हे तर तेजश्रीने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. म्हणूनच तेजश्रीने शेअर केलेली कोणतीही पोस्ट लगेच चर्चेत येते. तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे जो पाहून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकरांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. आताही ती काही प्रोजेक्ट्साठी काम करत आहे. या दरम्यान तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेजश्रीने साडी नेसली आहे, डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या आहेत आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे दिसत आहे. हा फोटो वधू वेशातील असल्यामुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
पण या फोटोसोबत लिहिलेले कॅप्शन नीट वाचले तर तर्क लावायची गरज पडणार नाही हे खरं. अभिनेत्री तेजश्री प्रधानने शेअर केलेला हा फोटो पाहून जर तुम्हाला तिचं लग्न झालंय असं वाटत असेल तर हे तसं नाहीये. तिचा हा फोटो १२ वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये ती ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासोबत दिसतेय. हि तिच्या कारकिर्दीतील आठवण आहे.
तेजश्रीने डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात तरुण वयातील डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. याच सिनेमात मोहन आगाशे यांनी बाबा आमटे यांची भूमिका साकारली होती. हा तेव्हाचा फोटो आहे. तर आज अनेक वर्षांनी तेजश्री आणि डॉ. मोहन आगाशे पुन्हा एकदा एकत्र एका नव्या प्रोजेक्ट्मध्ये काम करत आहेत. यानिमित्त तिने हि पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘१२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर त्याचं रिक्रेअशन. इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका’.
Discussion about this post