हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ऍक्शन रिऍलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चा १३ वा सीजन लवकरच येणार आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाचं हे नवं पर्व आधीपेक्षा जास्त थ्रिलिंग आणि हटके असणार आहे. यावेळीसुद्धा बॉलिवूडचा ऍक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी कार्यक्रमाची सूत्र सांभाळताना दिसणार आहे. आता यंदा या नव्या सीजन मध्ये ऍक्शनचा कोणता डोस स्पर्धकांना दिला जाणार याबाबत उत्सुकता आहेच. शिवाय कार्यक्रमातील खतरें झेलायला कोणकोण सहभागी होणार आहे..? याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. तर खतरों के खिलाडी सीजन १३’मध्ये सहभागी होण्यासाठी काही नावांची चर्चा सुरु आहे. तर काही नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. चला तर जाणून घेऊया KKK१३ च्या संभाव्य यादीत कोण कोण सामील आहे ते खालीलप्रमाणे :-
1. शिव ठाकरे – आपला मराठी माणूस शिव ठाकरे तर रिऍलिटी शोची जान आहे. आतापर्यंत विविध रिऍलिटी शो करून यंदाच्या बिग बॉस १६ मध्ये त्याने सहभाग घेतला होता आणि यामुळे तो सतत चर्चेत राहिला. त्याचा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला. शिवाय ‘खतरों के खिलाडी १३’साठी स्पर्धकांची निवड करायला रोहित शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात गेला असताना शिव टास्क हरला होता. पण शिवची एकंदरीत खेळी पाहता रोहितने त्याला ‘खतरों के खिलाडी सीजन १३’साठी विचारणा केली आहे. शिवाय एका मुलाखतीत बोलताना शिव या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे त्याने संकेत दिले आहेत.
2. अर्चना गौतम – बिग बॉस १६ मध्ये जिचा आवाज सतत ऐकू यायचा आणि जी वारंवार चर्चेत यायची ती राडा क्वीन अर्चना गौतम देखील शिव ठाकरेप्रमाणे ‘खतरों के खिलाडी सीजन १३’चा भाग होऊ शकते. अर्चना ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यापासून ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण तशी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अर्चनाने या शोमध्ये सहभागी होण्याबाबत रस दाखवला आहे.
3. सूंम्बुल तौकीर खान – सूंम्बुल तौकीर खानदेखील बिग बॉस सीजन १६ चा भाग राहिली आहे. वयाने सगळ्यात लहान असूनही तिने या खेळात पाय रोवून ठेवले होते. तसेच टीव्ही मालिका विश्वात तिची हवा आहे आणि यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चाहत्यांची इच्छा आहे कि तिने रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ मध्ये सहभाग घ्यावा.
4. प्रियंका चहर चौधरी – बिग बॉस सीजन १६ चा बुलंद आवाज प्रियांका चहर चौधरी या शोमध्ये तर रँक ३ वर बाहेर पडली. पण चाहत्यांच्या मनात तिने जागा मिळवली आहे आणि त्यामुळे प्रियांका देखील ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. तशी इच्छा स्वतः प्रियांकाने व्यक्त केली आहे. मात्र याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल.
5. अंकित गुप्ता – बिग बॉस सीजन १६ मधील सगळ्यात आळशी पण वन वर्ड मास्टर स्ट्रोक लागवणारा अंकित गुप्तासुद्धा ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. बिग बॉसमध्ये झोपताना दिसलेला अंकित आता खतरों के खिलाडीमध्ये काय कमाल करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
6. सौंदर्या शर्मा – आतापर्यंत ‘खतरों के खिलाडी सीन १३’साठी अनेक कलाकारांना विचारणा करण्यात आली आहे. त्यापैकी एक बिग बॉस १६ ची स्पर्धक सौंदर्य शर्मा देखील आहे. मात्र खतरों के खिलाडीच्या टीमला तिने होकार दिला कि नकार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
7. उर्फी जावेद – आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे सतत चर्चेत असणारी आणि सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होणारी उर्फी जावेददेखील यंदा रोहित शेट्टीच्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात ती सहभागी होणार असल्याचे अनेक माध्यमांनी सांगितले आहे.
8. नकुल मेहता – लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते है २’मध्ये राम कपूर या मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता नकुल मेहता नेहमीच आपल्या कातिल नजरने तरुणींना घायाळ करत असतो. पण यावेळी रोहित शेट्टीच्या आव्हानांसमोर तो घायाळ व्हायला तयार झाला आहे. त्यामुळे त्याच्या टीमने सांगितल्याप्रमाणे तो लवकरच ‘खतरों के खिलाडी सीजन १३’मध्ये दिसणार आहे.
9. दिशा परमार – ‘बडे अच्छे लगते है २’मधील फक्त राम नाही तर प्रियासुद्धा म्हणजेच अभिनेत्री दिशा परमारदेखील यावेळी ‘खतरों के खिलाडी सीजन १३’मध्ये सहभागी होणार आहेत. दिशा परमार हि प्रसिद्ध गायक आणि खतरों के खिलाडीच्या मागील सिजनमधील स्पर्धक राहुल वैद्य याची पत्नी आहे.
10. मुनव्वर फारुकी – बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ या शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकीदेखील यंदाच्या ‘खतरों के खिलाडी सीजन १३’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. फक्त अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वासाठी अद्याप या कलाकारांची नावे जास्त चर्चेत आहेत. त्यानुसार हि संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे. मात्र अजूनही ‘खतरों के खिलाडी’च्या मेकर्सने स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर न केल्यामुळे या नावांवर मोहर लावता येणार नाही.
Discussion about this post