हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यात अश्विनी हि केवळ एक अभिनेत्री नसून ती एक समाजसेविका आहे. यामुळे विविध उपक्रम करताना ती नेहमीच दिसते. विविध माध्यमातून अश्विनीची चर्चा कायमच असते. आता जो चर्चेत असतो, जो यशस्वी होत असतो त्याचे पाय ओढणारे हजारो असतात हे काही नवीन सांगायला नको. अशा लोकांसाठी अश्विनीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर हात जोडलेला एक फोटो पोस्ट करीत तिने या फोटोसोबत काही परखड गोष्टी अगदी थेट मांडल्या आहेत.
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुमच्याबद्दल चांगले बोलणारे असतात तसे वाईट पसरवणारे सुद्धा असतातच. त्यांच्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे तुमच्या नजरेतला विश्वास. कोणी वाईट असो वा चांगले सगळ्यांसमोर हात जोडणे आपली संस्कृती आहे आणि “गनिमी कावा” आपला इतिहास..’ आता हि पोस्ट नेमकी तिने कुणासाठी शेअर केली आहे हे सांगणे अवघड असले तरीही समजने वाले को इशारा काफी है म्हणायचं.
अभिनेत्री अश्विनी महांगडेने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत राणू आक्कांची भूमिका साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. यानंतर आता अश्विनी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत अनघा या भूमिकेत दिसत आहे. अश्विनीच्या या भूमिकेवर देखील प्रेक्षक प्रेम करत आहेत. या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, ओंकार गोवर्धन, इला भाटे अशा कलाकारांसोबत अश्विनी स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठान हि अश्विनीची स्वतःची सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसते.
Discussion about this post